Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२८६ पुरुषार्थात्फलप्राप्तिर्देशकालवशादिह ।
५७
प्राप्ता चिरेण शीघ्रं वा यासौ दैवमिति स्मृता ॥ २७ २१
पुरुषप्रयत्नानेंच होणारी फलप्राप्ति देश व काल यांच्या परिस्थितीप्रमाणें लवकर किंवा उशिरां होत असते. यालाच दैव असें म्हणतात.
२८७ पूजनं ध्यानमेवान्तर्नान्यदस्त्यस्य पूजनम् ।
तस्मात्त्रिभुवनाधारं नित्यं ध्यानेन पूजयेत् || ६ |३८|६
परमेश्वराचें अंतःकरणांत ध्यान करणें हेंच त्याचें मुख्य पूजन होय. त्याहून दुसरें पूजन नाहीं. यासाठीं त्रिभुवनाचा आधार जो परमात्मा, त्याचें ध्यानाच्या योगानें नेहमीं पूजन करावें. २८८ पूर्णस्तु प्राकृतोऽप्यन्यत् पुनरप्यभिवाञ्छते ।
जगत्पूरणयोग्याम्बुर्गृह्णात्येवार्णवो जलम् || ४ | २३/५५
सर्व जगाला बुडवून टाकतां येईल, इतका पाण्याचा सांठा ज्यांत भरलेला आहे, असा समुद्र देखील तेवढ्यानें तृप्त न होतां जास्त जास्त पाणी सांठवीत असतो; त्या प्रमाणें प्राकृत मनुष्य कितीही श्रीमान् असला, तरी अधिकाधिक संपत्तीची हाव बाळगीतच असतो. २८९ पूर्वसिद्धस्वभावोऽयमादेहं न निवर्तते || ३ | ८२ ।४० देह पडेपर्यंत पूर्वसिद्ध स्वभाव पालटत नाहीं. २९० पूर्वापरविचारार्थचारुचातुर्यशालिनी ।
सविकासा मतिर्यस्य स पुमानिह कथ्यते ।। २ ।११/७२ पूर्वापर विचार आणि कोणताही सूक्ष्म अर्थ उत्तम रीतीनें ग्रहण करण्याचें चातुर्य जिला आहे, अशी विकास पावलेली बुद्धि ज्याचे ठिकाणी आहे तोच खरा मनुष्य समजावा.
For Private And Personal Use Only