Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५०
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२४८ न हि जानाति दुर्बुद्धिविनाशं प्रत्युपस्थितम् || ३|१०२|३६
दुर्बुद्धि असलेल्या मनुष्याला आपल्या पुढे येऊन ठेपलेला स्वतःचा नाश समजून येत नाहीं.
२४९ न हि तज्ज्ञस्य शान्तस्य ममाहमिति विद्यते || ७|३०|२
तत्त्वज्ञ आणि शांत मनुष्याचे ठिकाणी 'मी' आणि 'माझे' असे दोन्ही भाव नसतात. २५० न हि पर्यनुयोक्तव्याः स्वप्रविभ्रमरीतयः ।
न तदस्ति जगत्यस्मिन् यन्न संभवति भ्रमे || ६ |६१।१६ परमात्म्याची माया अघटितघटना करण्यांत मोठी पटाईत आहे, त्यामुळे या जगांत स्वप्न. भ्रम इत्यादिकांप्रमाणे ' असें कसें होऊं शकेल' असें म्हणतांच येत नाहीं. जें भ्रमांत संभवत नाहीं, असें या जगांत कांहीं नाहीं.
२५१ न हि सच्चवतामस्ति दुःसाध्यमिह किंचन ।। ३ ।८२/२९ उद्योगी लोकांना मिळविण्यास कठीण असें या जगांत कांहींएक नाहीं.
२५२ ना यथा यतते नित्यं यद्भावयति यन्मयः ।
यादृगिच्छेच भवितुं तादृग्भवति नान्यथा ॥७।१५७/३१
मनुष्य नित्य ज्यासाठीं अगदीं तन्मय होऊन अनन्य भावानें प्रयत्न करतो व जसें होण्याची इच्छा करतो, तसाच तो होतो. एरवी कधीही होत नाहीं.
२५३ नाशोऽपि सुखयत्यज्ञ मेकवस्त्वतिरागिणम् || ३|७०।२३
एखाद्या वस्तूवर आसक्त झालेल्या अज्ञ मनुष्याला स्वतःचा नाश झाला तरी तो सुद्धां सुखदायकच वाटतो.
For Private And Personal Use Only