Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२५४ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। ___ यत्तु नास्ति स्वभावेन कः क्लेशस्तस्य मार्जने ॥३।७।३८ जें असत् आहे, त्याला कधीं अस्तित्वच नाही, आणि जें सत् आहे त्याचा केव्हाही अभाव होऊ शकत नाही. म्हणून जें वस्तुतः नाही, ते नाहीसे करण्याला क्लेश कसले ? । २५५ नासिधारा न वज्राचिर्न तप्तायाकणार्चिषः ।
तथा तीक्ष्णा यथा ब्रह्मंस्तृष्णेयं हृदि संस्थिता॥१११७४८ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो ) मनुष्याच्या हृदयामध्ये राहणारी तृष्णा ही जितकी तीक्ष्ण असते, तितकी तरवारीची धार, वज्राचे तेज किंवा तापलेल्या लोखंडांतून बाहेर पडणान्या ठिणग्या तीक्ष्ण नसतात. २५६ नास्ति शत्रुः प्रकृत्यैव न च मित्रं कदाचन ।
सुखदं मित्रमित्युक्तं दुःखदाः शत्रवः स्मृताः॥५।५३१५८ कोणी कोणाचा मूळचाच शत्रु नाही, व मूळचाच मित्रही नाही. सुख देणारा तो मित्र, व दुःख देणारा तो शत्रु, असेंच मानले जाते. २५७ नाहं देहस्य नो देहो मम नायमहं तथा।
इति विश्रान्तचित्ता ये ते मुने पुरुषोत्तमाः १११८५३ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) 'मी देहाचा कोणी नाहीं, देह माझा कोणी नाही, व हा देह हे माझें खरें स्वरूप नव्हे, ' या भावनेने जे मनुष्य परमात्मस्वरूपांत स्थिर होतात, तेच उत्तम पुरुष होत. २५८ नित्यं सज्जनसंपर्काद्विवेक उपजायते ।
विवेकपादपस्यैव भोगमोक्षौ फले स्मृतौ ॥ २॥११॥५८ __ सज्जनांचा सहवास केल्याने विवेक अवश्य उत्पन्न होतो, व भोग आणि मोक्ष ही त्या विवेकरूपी वृक्षाचींच फळे आहेत.
For Private And Personal Use Only