Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
५०१ हंसो यथा राजतपञ्जरस्थः सिंहो यथा मन्दरकन्दरस्थः । वीरो यथा गर्वितकुञ्जरस्थचन्द्रोऽपि बभ्राज तथाम्बरस्थः || ५|५|४
( लंकेत गेलेल्या मारुतीनें चंद्र अवलोकन केला. ) रुप्याच्या पिंजऱ्यामध्यें असलेला हंस जसा शोभतो, मंदरपर्वताच्या गुहेंत राहिलेला सिंह जसा दिसतो आणि मदोन्मत्त हत्तीवर आरूढ झालेला वीर जसा चमकतो, तसा आकाशांत असलेला चंद्र झळकूं लागला.
५०२ हित्वा धर्मं तथार्थं च कामं यस्तु निषेवते ।
१०७
स वृक्षाग्रे यथा सुप्तः पतितः प्रतिबुध्यते || ४|३८|२२
( राम सुग्रीवाला म्हणतो. ) धर्म व अर्थ यांची पर्वा न करितां जो कामाचेंच सेवन करितो, तो, वृक्षाग्रावर झोपी गेलेला पुरुष ज्याप्रमाणें खालीं पडल्यावर जागा होतो, त्याप्रमाणें ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्यानंतर शुद्धीवर येतो.
For Private And Personal Use Only