Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१ अकृत्रिमं सुखं कीर्तिमायुश्चैवाभिवाञ्छता । प्र०स० लो० सर्वाभिमतदानेन पूजनीया गुणान्विताः || ३|७७/२६ स्वाभाविक सुख, कीर्ति आणि आयुष्य ह्यांची इच्छा करणाऱ्या मनुष्यानें सर्वांना इष्ट अशा दानाच्या योगानें गुणिजनांचा सत्कार करणें योग्य आहे.
२ अकृत्रिमफलं त्यक्त्वा यः कृत्रिमफलं व्रजेत् ।
त्यक्त्वा स मन्दारवनं कारचं याति काननम् ।।६।२९।१२६ स्वाभाविक फळ सोडून कृत्रिम फळाच्या मागे लागणारा, स्वर्गीतील मंदारवन सोडून कड्डू करंजाच्या वनांत जाणारा समजावा. ३ अजितात्मा जो मूढो रूढो भोगेककर्दमे ।
आपदां पात्रतामेति पयसामिव सागरः ।। ७।३३।२२ ज्याप्रमाणें पाणी शेवटीं समुद्राला जाऊन मिळतें, त्याप्रमाणें आत्मसंयमन न करणाऱ्या व भोगरूपी चिखलांत रुतून गेलेल्या मूढ मनुष्याला सर्व आपत्ति प्राप्त होतात. ४ अज्ञतातज्ज्ञते पूर्वं वक्तुर्निणय कार्यतः ।
यः करोति नरः प्रश्नं प्रच्छकः स महामतिः ।। २।११।४७ व्यवहारावरून वक्ता तज्ज्ञ आहे किंवा नाहीं, याचा प्रश्न करण्यापूर्वी विचार करून नंतर जो मनुष्य प्रश्न करितो तो खरोखरीच बुद्धिमान होय.
For Private And Personal Use Only