Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
११७ कार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम् । ___ महदप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकालतः॥ १।७२६ योग्यवेळी एखाद्याचे लहानसें काम केले तरी तो मनुष्य आभारी होतो; परंतु वेळ निघून गेल्यावर कितीही मोठा उपकार केला तरी फुकट जातो. ११८ कालः कवलनैकान्तमतिरत्ति गिरनपि । __ अनन्तैरपि लोकौधैर्नायं तृप्तो महाशनः ॥ १।२३।१०
काल हा सर्वांना खाऊल टाकण्यांत अगदी दंग झालेला आहे. तो एकाच वेळी अनेकांचा संहार करीत असतो. तो इतका अधाशी आहे की, अगणित लोकांचा संहार करूनही त्याची तृप्ति होत नाही. (तोंडांत घास असतांना आणखी खातच असतो.) ११९ कालविद्भिर्विनिर्णीतं पाण्डित्यं यस्य राघव ।
अनध्यापित एवासौ तज्ज्ञश्चेदैवमुत्तमम् ॥ २।८।१९ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, एखादा मनुष्य पंडित होणार, असें ज्योतिष्याने भाकीत केले, परंतु अध्ययन न करतां असा मनुष्य विद्वान होऊ शकेल, तर दैव बलिष्ठ आहे असे म्हणता येईल. १२० कालविद्भिर्विनिर्णीता यस्यातिचिरजीविता ।
स चेज्जीवति संछिन्नशिरास्तदैवमुत्तमम् ॥ २।८।१८ एखादा मनुष्य पुष्कळ दिवस जगणार असें ज्योतिष्याने सांगितले, आणि अशा स्थितीत त्या मनुष्याचे डोके उडविलें असतांही तो जगला, तर मात्र दैव समर्थ आहे, असे म्हणता येईल. १२१ कालः सर्वकषो ह्ययम् ॥ ७१४०५ काल हा सर्वांचाच नाश करणारा आहे.
For Private And Personal Use Only