Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२२६ न किंचिद्दीर्घसूत्राणां सिध्यत्यात्मक्षयादृते ॥३७८८
दीर्घसूत्री मनुष्य विलंब करून आपल्या कार्याचा नाश करून घेतात, यापेक्षा जास्त काही त्यांच्या पदरांत पडत नाही. २२७ न केचन जगद्भावास्तत्त्वज्ञ रञ्जयन्त्यमी । ___ मर्कटा इव नृत्यन्तो गौरीलास्यार्थिनं हरम् ॥४५७५६
गौरीच्या नृत्याची इच्छा करणा-या शंकरापुढे माकडे नाचूं लागली असता त्याला त्याबद्दल प्रेम वाटणे शक्य नाही, त्याप्रमाणे या जगांतील कोणतीही वस्तु ज्ञानी पुरुषाचे चित्त आकर्षण करूं शकत नाही. २२८ न क्षमन्ते महान्तोऽपि
__ पौनःपुन्येन दुष्क्रियाम् ॥ ५।३०।१२ वारंवार केलेल्या अपराधांची महात्मे देखील क्षमा करीत नाहीत. २२९ नगयों दह्यमानायां भूषितायां तथोत्सवे ।
सम एव महीपालो जनको भूभृतां वरः ॥७।१९८१३१ राजधानीची मिथिलानगरी जळू लागली किंवा उत्सवाचे वेळी ती सुशोभित केली, तरी दोन्ही स्थितीत राजश्रेष्ठ जनकराजाची अंतःकरणाची समता कायम असे. २३० न च निस्पन्दता लोके दृष्टेह शवतां विना । __ स्पन्दाच्च फलसंप्राप्तिस्तस्मादेवं निरर्थकम् ॥ २।८८
हालचाल ही फक्त प्रेतामध्येच काय ती होत नाहीं; हालचाल केल्यानेच फलप्राप्ति होत असल्यामुळे दैव हे निरर्थक आहे. २३१ न जातु ते विगण्यन्ते गणनासु गरीयसाम् ।
ये तरङ्गैस्तुणानीव ह्रियन्ते हर्षशोकयोः॥६।१२७।५० लाटांबरोबर गवत वाहत जाते त्याप्रमाणे जे हर्षशोकांच्या तडाक्यांत सांपडतात, त्यांची गणना श्रेष्ठ लोकांमध्ये होत नाही.
For Private And Personal Use Only