Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१९९ दुःखशोकमहाष्टीलः कष्टकण्टकसंकटः । सहस्रशखतां याति दारिद्र्य शाल्मलिः ||६/७ १९
दुःख व शोक या ज्याच्या मोठ्या बिया आहेत, कष्टरूपी कांट्यांनी जो भरून गेला आहे, असा हा दारिद्र्यरूपी बळकट सावरीचा वृक्ष 'हजारों खांद्यांनीं विस्तार पावतो.
२०० दुःखानि मौर्ण्यविभवेन भवन्ति यानि नैवापदो न च जरामरणेन तानि || ६ |८८।२७
आपत्ति, जरा व मरण यांच्या पासून जें दुःख होत नाहीं, तें मूर्खपणाच्या प्रभावानें भोगावें लागतें.
दुःख
२०१ दुःखाद्यथा दुःखकाले हा कष्टमिति कथ्यते । हाकष्टशब्दपर्यायस्तथा हादैवमित्यपि || २|६| ३
४ १
दुःखाचे वेळीं ' हाय हाय, केवढी दुःखाची गोष्ट' असे उद्गार निघतात. या अर्थानंच कधीं कधीं ' हाय हाय, देव केवढें बलिष्ठ आहे' असेही उद्गार पर्यायानें निघतात.
२०२ दुःखितस्य निशा कल्पः सुखितस्यैव च क्षणः ३।६०।२२
मनुष्य दुःखी कष्टी असला म्हणजे त्याला एक रात्र कल्पाप्रमाणे दीर्घ वाटते आणि सुखामध्यें कितीही काळ लोटला, तरी तो त्याला एक क्षणाप्रमाणेंच वाटतो.
२०३ दुरीहितं दुर्विहितं सर्व सज्जनसूक्तयः ।
प्रमार्जयन्ति शीतांशोस्तमः काण्डमिवाङ्मयः || ५|४/७
ज्याप्रमाणें चंद्राचे किरण अंधकाराचा नाश करतात, त्याप्रमाणें सज्जनांची चांगलीं वचनें सर्व शारीरिक व मानसिक दोष दूर
करतात.
For Private And Personal Use Only