Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३९
१८८ तुच्छोऽप्यर्थोऽल्पसत्त्वानां
गच्छति प्रार्थनीयताम् ॥ ३७०।३१ क्षुद्र अंतःकरणाचे लोक नेहमीं क्षुद्र फलासाठीच धडपडत असतात. १८९ तुल्यवर्णच्छदैः कृष्णः संगतैः किल कोकिलैः ।
केन विज्ञायते काकः स्वयं यदि न भाषते ॥७११६६६६ कोकिल पक्ष्यांप्रमाणेच पंख, रंग हे असणारा कावळा त्या कोकिलांच्या बरोबर असतां जोपर्यंत स्वतःचा शब्द करीत नाही, तोपर्यंत तो कोणाला ओळखू येणार आहे ? १९० ते पूज्यास्ते महात्मानस्त एव पुरुषा भुवि ।
ये सुखेन समुत्तीर्णाः साधो यौवनसंकटात ॥१॥२०१४१ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) जे पुरुष यौवनरूपी संकटांतून सुखाने तरून जातात, तेच पृथ्वीवर पूज्य, तेच महात्मे, आणि तेच खरे पुरुष होत. १९१ ते महान्तो महाप्राज्ञा निमित्तेन विनैव हि ।
वैराग्यं जायते येषां तेषां ह्यमलमानसम् ॥ २।११।२४ ते महाबुद्धिमान महात्मे खरोखरच धन्य होत की, ज्यांच्या निर्मल मनामध्ये निमित्ताशिवायच वैराग्य उत्पन्न होतें. १९२ त्यक्तावनेविटपिनो भूयः पत्राणि नो यथा ।
निर्वासनस्य जीवस्य पुनर्जन्मादि नो तथा॥५।४८५५ वृक्षाची मुळेच तोडून टाकली म्हणजे त्याच्यावर पुन्हां पाने येत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या वासना नाहीशा झालेल्या आहेत, अशा प्राण्याला पुनर्जन्मादि अवस्था प्राप्त होत नाहीत.
For Private And Personal Use Only