Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३८
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१८३ ताडितस्य हि यः पश्चात्संमानः सोऽप्यनन्तकः । शालेग्रीष्माभितप्तस्य कुसेकोऽप्यमृतायते ||४|२३।५३ उन्हानें करपून गेलेल्या भाताच्या शेतावर थोडासा पाऊस पडला तरी त्याला ती अमृतवृष्टि वाटते, त्याप्रमाणें पुष्कळ कालपर्यंत निग्रह केलेल्या मनाला थोडासा मान दिला म्हणजे तें संतुष्ट होतें. १८४ तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः
क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति ।। ७।१६३।५६
हेकेखोर लोक जवळ असलेले गंगोदक न पितां, ही आमच्या बापाची विहीर आहे, असें म्हणून तिचेंच खारट पाणी पितात. १८५ तावदुत्तमतामेति पुमानपि दिवौकसाम् ।
कृपणैरिन्द्रियैर्यावत्तणवन्नापकृष्यते || ७|६|४२
विषयासक्त होणारी इंद्रियें जोपर्यंत मनुष्याला गवताप्रमाणें आकर्षण करीत नाहींत, तोंपर्यंतच तो देवांना देखील मान्य होतो. १८६ तावन्नयति संकोचं तृष्णा वै मानवाम्बुजम् ।
यावद्विवेकसूर्यस्य नोदिता विमला प्रभा ।। २।१३।२० जोपर्यंत विवेकरूपी सूर्याचा उदय होऊन त्याचा स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरला नाहीं, तोंपर्यंतच तृष्णा ही मनुष्यरूपी कमलाला संकुचित करते.
१८७ तिष्ठतस्तव कार्येषु मास्तु रागेषु रञ्जना |
स्फटिकस्येव चित्राणि
प्रतिविम्बानि गृह्णतः || ३|११४।७६
( श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) स्फटिक मणि अनेक प्रकारच्या वस्तूंचीं प्रतिबिंबें ग्रहण करतो, परंतु तो त्या वस्तूंचे ठिकाणीं आसक्त होत नाहीं; त्याप्रमाणें व्यवहारांत वावरत असतां मोह उत्पन्न करणाऱ्या विषयांच्या ठिकाणीं तुझें चित्त आसक्त न होवो.
For Private And Personal Use Only