Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१७३ ज्ञानवानेव सुखवान ज्ञानवानेव जीवति ।
ज्ञानवानेव बलवांस्तस्माज्ज्ञानमयो भव ॥ ५।९।४९ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, जो ज्ञानी असतो, तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत, आणि तोच खरा बलवान् असतो; म्हणून तूं ज्ञानी हो. १७४ ज्ञानाद्विषयवैरस्यं स समाधिहि नेतरः ॥ ७४६।१५
ज्ञानामुळे विषयांची आवड नाहीशी होणे, हीच समाधि होय. इतर कारणांमुळे विषय नावडणे ही समाधि नव्हे. १७५ ज्ञानिनैव सदा भाव्यं राम न ज्ञानबन्धुना ।
अज्ञातारं वरं मन्ये न पुननिबन्धुताम् ॥ ७।२।१ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) प्रत्येकाने ज्ञानी व्हावे, पण ज्ञानाच्या योगाने यथेष्ट आचरण करणारा ज्ञानबंधु होऊं नये. अशा ज्ञानबंधूपेक्षा मुळीच ज्ञान नसलेला बरा; असें मी समजतो. १७६ तचिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम् ।
एतदेकपरत्वं च तदभ्यासं विदुर्बुधाः ॥ ३।२२।२४ श्रवणाच्या योगाने समजलेले तत्त्व बुद्धीमध्ये आरूढ व्हावें, अशा दृष्टीने त्याचे निरंतर चिंतन करणे, ज्ञात्या पुरुषांशी संवाद करणे, समान अधिकाऱ्यांनी तें तत्त्व एकमेकांना सांगून त्यासंबंधान परस्परांना बोध करून देणे आणि अखंड तदाकार वृत्ति राखण्याचा प्रयत्न करणे, याला ज्ञाते पुरुष अभ्यास असे म्हणतात. १७७ तडित्सु शरदभ्रेषु गन्धर्वनगरेषु च ।
स्थैर्य येन विनिर्णीतं स विश्वसितु विग्रहे ॥ १।१८।६१ आकाशांतील वीज, शरहतूमधील मेघ आणि गंधर्वनगर ही सर्व स्थिर आहेत, असें ज्याला वाटत असेल, त्याने देहाच्या शाश्वतीविषयीं खुशाल विश्वास बाळगावा.
For Private And Personal Use Only