Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
wwermeranarmed
१६३ जायते दर्शनादेव मैत्री विशदचेतसाम् ॥ ३७८१३५
मोकळ्यामनाची माणसे एकमेकांना भेटताक्षणी त्यांची परस्पर मैत्री जमत असते. १६४ जायन्ते च नियन्ते च शरीराणि शरीरिणाम् ।
पादपानां च पर्णानि का तत्र परिदेवना ॥६॥३२॥५० झाडांना पाने येतात, व पुढे गळून पडतात; त्याप्रमाणे प्राण्यांची शरीरें उत्पन्न होतात व पुढे नष्ट होतात; यांत दुःख कशाचें ? १६५ जितेन्द्रिया महासत्त्वा ये त एव नरा भुवि ।
शेषानहमिमान्मन्ये मांसयन्त्रगणांश्चलान् ॥ ७६६४३ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) ज्यांनी इंद्रियें जिंकिली आहेत, आणि जे अत्यन्त धैर्यवान् व बुद्धिशाली आहेत, त्यांनाच या पृथ्वीवर खरोखर 'मनुष्ये' असें म्हणता येईल. बाकीचे लोक म्हणजे केवल हालचाल करणारी मांसाची यंत्रेच होत असें मी समजतों. १६६ जिते मनसि सर्वैव विजिता चेन्द्रियावलिः।
शीर्यते च यथा तन्तौ दग्धे मौक्तिकमालिका३।११०।२५ दोरा जळतांच त्यांत ओंवलेले मोत्यांचे दाणे गळून पडतात; त्याप्रमाणे एक मन जिंकले म्हणजे सर्व इंद्रिये जिंकली गेली असे समजावे. १६७ जीर्यन्ते जीर्यतः केशा दन्ता जीयन्ति जीर्यतः ।
क्षीयते जीर्यते सर्वं तृष्णैवैका न जीर्यते ॥ ७१९३८६ वृद्ध झालेल्या प्राण्यांचे केस पिकतात, दांत पडतात, सर्व अवयव शिथिल होतात, पण एक तृष्णा मात्र तरुण राहते, ती कमी होत नाही.
For Private And Personal Use Only