Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
३२
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१५३ जन्मान्तरशताभ्यस्ता राम संसारसंस्थितिः ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सा चिराभ्यासयोगेन विना न क्षीयते क्वचित् ५।९२।२३
संसारस्थितीचा अभ्यास मागील शेंकडों जन्मांत झालेला आहे, त्यामुळें दीर्घ काल साधनांचा अभ्यास केल्यावांचून संसारस्थिति क्षीण होणार नाहीं.
१५४ जयन्ति ते महाशूराः साधवो यैर्विनिर्जितम् ।
अविद्यामेदुरोल्लासैः स्वमनो विषयोन्मुखम् || ४ | ३५ | १
अविद्येच्या योगानें विलक्षण रीतीनें उल्लास पावणारें आणि विषयोन्मुख होणारे स्वतःचें मन ज्यांनी जिंकले अशा महाशूर सत्पुरुषांचा जयजयकार असो !
१५५ जराकुसुमितं देहद्रुमं दृष्ट्चैव दूरतः ।
अध्यापतति वेगेन मुने मरणमर्कटः || १।२२।१६
(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) हे मुने, देहरूपी वृक्ष म्हातारपणामुळें फुलला आहे असें दुरून दृष्टीस पडतांच मरणरूपी माकड त्यावर जोरानें झडप घालतें.
१५६ जरा जगत्यामजिता जनानां
सर्वेषणास्तात तिरस्करोति ।। १।२२।३८
( राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) म्हातारपण हॅ अजिंक्य आहे, तें मनुष्यांच्या सर्व इच्छांना न जुमानतां त्यांच्यावर आपला पगडा बसवितें.
१५७ जरामार्जारिका भुङ्के यौवनाखं तथोद्धता ।
परमुल्लासमायाति शरीरामिषगर्धिनी || १ | २२/२५
जरा ही उद्धट मांजरी असून ती तारुण्यरूपी उंदीर गट्ट करून टाकते आणि शरीररूपी भक्ष्य भक्षण करण्यास अगदीं टपून बसलेली असते.
For Private And Personal Use Only