Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१०८ एतया तदलं मेऽस्तु तुच्छया पूर्वचिन्तया । पौरुषं याति साफल्यं वर्तमानचिकित्सया ||५/२५/१६
( बलि म्हणतो ) गत गोष्टीबद्दल शोक करण्यांत काय अर्थ आहे ? वर्तमानकाळी कोणती गोष्ट कर्तव्य आहे, याचा विचार केल्यानें पुरुषप्रयत्न सफल होतो. १०९ एतावति धरणितले सुभगास्ते साधुचेतनाः पुरुषाः ।
पुरुष कलासु च गण्या
न जिता ये चेतसा स्वेन || ४।२३।६०
२३
या पृथ्वीवर तेच भाग्यवान्, साधु, खरे पुरुष, आणि कलावान् होत कीं, ज्यांना त्यांच्या चित्तानें जिंकून त्यांच्यावर आपला पगडा बसविला नाहीं.
११० एतावतैव देवेशः परमात्मावगम्यते ।
१११ एतावदेव बोधस्य
काष्ठोष्टसमत्वेन देहो यदवलोक्यते || ५ | ६४।४४
देह हा काट व ढेकूळ यांच्या सारखा जड आहे ही गोष्ट मनांत निरंतर वागवीत जाणें हाच देवश्रेष्ठ परमात्म्याच्या ज्ञानाचा उपाय आहे.
बोधत्वं यद्वितृष्णता । पाण्डित्यं नाम तन्मौख्यं
यत्र नास्ति वितृष्णता || ७|१९४।३४
च खरें ज्ञान कीं, ज्याच्या योगानें विषयलालसा नाहींशी होईल. ज्याच्यायोगानें विषयतृष्णा नाहींशी होत नाहीं असें पांडित्य म्हणजे केवळ मूर्खत्वच होय.
For Private And Personal Use Only