Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
साथश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
९९ ईश्वरो न महाबुद्धे दूरे न च सुदुर्लभः ।
महाबोधमयैकात्मा स्वात्मैव परमेश्वरः ॥७॥४८॥२२ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) ईश्वर दूर नाहीं, तो अतिशय दुर्लभही नाही. परमेश्वर ज्ञानस्वरूप, एकरूप असून स्वतःचा आत्माच आहे. १०० उत्कन्धरो विततनिर्मलचारुपक्षो
हंसोऽयमत्र नभसीति जनैः प्रतीतः । गृह्णाति पल्वलजलाच्छफरीं यदासौ
ज्ञातस्तदा खलु बकोऽयमितीह लोकैः ॥७११८.५ आकाशांतून जात असतांना वर उंच केलेली मान व पसरलेले शुभ्र सुंदर पंख यांवरून ' हा हसच असावा, ' असें प्रथम लोकांना वाटले; परंतु पुढे जेव्हां डबक्यांतील पाण्यातून मासे गट्ट करीत आहे असे दृष्टीस पडल, तेव्हां ' हा बगळा आहे' अशी लोकांची खातरी झाली. (बाह्य आकारावरून जरी एखाद्याची बरोबर ओळख न पटली, तरी त्याचे आचरण पाहिल्यावर ती सहज पटते.) १०१ उत्थितानुत्थितानेतानिन्द्रियाहीन्पुनःपुनः ।
हन्याद्विवेकदण्डेन वज्रेणेव हरिगिरीन् ॥ ५।८।१७ इंद्र आपल्या वज्राने पर्वतांचे चूर्ण करून टाकितो, त्याप्रमाणे इंद्रियरूपी सोनी आपली डोकी वर केलेली असोत किंवा नसोत, ती विवेकरूपी दंडाने पुनः पुन्हां फोडून टाकावी. १०२ उत्सवादपि नीचानां कलहोऽपि सुखायते ॥३॥७०।७६
नीचवृत्तीच्या लोकांना आनंदोत्सवापेक्षाहि कलहच अधिक प्रिय असतो.
For Private And Personal Use Only