Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२८
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
* १३२ कोsहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः । न्यायेनेति परामर्शो विचार इति कथ्यते । २।१४/५०
माझें खरें स्वरूप काय व हा संसाररूपी दोष आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं कसा उत्पन्न झाला, इत्यादि प्रश्नांचें शास्त्रानें सांगितलेल्या मार्गानें चिंतन करणें यालाच विचार असें म्हणतात. १३३ क्षणमानन्दितामेति क्षणमेति विषादिताम् ।
क्षणं सौम्यत्वमायाति सर्वस्मिन्नटवन्मनः || १ |२८|३८ मनाची स्थिति एकाद्या नटाप्रमाणे क्षणांत आनंदाची तर क्षणांत खिन्नतेची व क्षणांत सौम्यतेची दिसून येते.
१३४ क्षणमायाति पातालं क्षणं याति नभःस्थलम् ।
क्षणं भ्रमति दिने तृष्णा हृत्पद्मषट्पदी ॥ १।१७ ३१
तृष्णा ही क्षणामध्यें पातालांत जाते, व क्षणामध्यें आकाशांत गमन करते अशा रीतीनें तृष्णा ही हृदयरूपी कमळावरील भ्रमरी असून दिशारूपी कुंजामध्यें भ्रमण करीत असते.
१३५ गम्भीराणि प्रसन्नानि साधुचेतः सरांसि हि ।।७।२३।३५ साधूंचीं अतःकरणरूपी सरोवरें खोल व स्वच्छ असतात.
१३६ गुणं ममेमं जानातु जनः पूजां करोतु मे ।
इत्यहंकारिणामीहा न तु तन्मुक्तचेतसाम् ||७|१०२।३१
माझा हा गुण लोकांना कळावा, त्यांनीं माझा सत्कार करावा, ही इच्छा अहंकार असलेल्या लोकांना असते. मुक्त झालेल्यांना अशी इच्छा मुळींच नसते.
१३७ गुणवति जने बद्धाशानां श्रमोऽपि सुखावहः । ७।११८।२६ गुणी मनुष्याच्या आशेवर राहून श्रम पडले तरी ते सुखावह होतात.
For Private And Personal Use Only