Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि www.rrmwarrrrrr.maa .५.१.१ ..१००००. . . . . .www.wommmmmaane ५० अम्लं मधुरसासिक्तं मधुरं मधुरञ्जितम् ।
बीजं प्रतिविषाकल्कसिक्तं च कटु जायते ॥ ४॥३५।२९ चिंचेच्या झाडाला मध, साखर इत्यादि पदार्थाचे खत घातले तर त्या चिंचेच्या झाडावर येणाऱ्या चिंचा गोड असतात. परंतु चिंचेला धोतरा, करंज यांच्या रसांचे खत घातल्यास त्याच चिंचा कडू निपजतात, असा आरामशास्त्राचा नियम आहे. ५१ अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु विगतावरणैव धीः ।५।१८६१ 'हा माझा बंधु' आणि 'हा माझा बंधु नन्हे' ही विचारसरणी क्षुद्र पुरुषांच्या ठिकाणी असते. परंतु श्रेष्ठ आचरणाच्या महात्म्यांच्या बुद्धीवरील संकुचित भावनेचे आवरण नाहीसे होऊन त्यांची बुद्धि सर्वत्र सम झालेली असते. ५२ अयोध्यासि च संतप्ते शुद्धे तप्तं तु लीयते ॥ ४।१७।२९
लोखंडाचे दोन तुकडे एकत्र ठेवल्याने एकमेकांत मिसळत नाहीत, परंतु कांहीं क्षार टाकून शुद्ध केलेले आणि तापवून द्रवमय झालेले तेच तुकडे एकमेकांत पूर्णपणे मिसळतात. ५३ अर्थिनां यनिराशत्वं सत्तमेऽभिभवो हि सः॥१७।१०
आपल्याकडे याचना करण्यासाठी आलेल्या मनुष्याची निराशा होणे हे सत्पुरुष लांछन समजतात. ५४ अर्ध सज्जनसंपर्कादविद्याया विनश्यति ।
चतुर्भागस्तु शास्त्रार्थश्चतुर्भागं स्वयत्नतः ॥ ७।१२।३७ सज्जनांच्या सहवासाने अर्धी अविद्या नष्ट होते. चतुर्थाश अविद्या शास्त्रविचाराने जाते. राहिलेला चतुर्थभाग आपल्या प्रयत्नानें घालवितां येतो.
For Private And Personal Use Only