Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
wwwmmmmmmmmmmmmmmm
५५ अलब्धज्ञानदृष्टीनां क्रिया पुत्र परायणम् ।
यस्य नास्त्यम्बरं पढें कम्बलं किं त्यजत्यसौ॥६।८७।१७ ज्यांना ज्ञानदृष्टि प्राप्त झाली नाही, त्यांना कर्म हेच परम साधन आहे. ज्याचेपाशी उंची वस्त्र नाहीं त्याने आपल्या जवळचा कांबळा टाकून देणे योग्य होईल काय ? ५६ अवश्यभाव्यस्तमयो जातस्याहर्पतेरिव ॥ ४।४८।२७ __ सूर्याचा उदय झाला म्हणजे त्याचा अस्त व्हावयाचा हा नियम जसा ठरलेला आहे, तसा जो प्राणी जन्मास आला तो केव्हांतरी मरणारच. ५७ अविरुद्धैव सा युक्तिर्ययापदि हि जीव्यते ॥ ३॥६८।१२
आपत्तीमध्ये वाटेल ती युक्ति योजून जिवंत राहणे ही गोष्ट शास्त्राला केव्हाही संमतच आहे. ५८ अशिष्यायाविरक्ताय यत्किचिदुपदिश्यते ।
तत्प्रयात्यपवित्रत्वं गोक्षीरं श्वदृताविव ॥ २।२।२१ जे ज्ञान विषयासक्त अयोग्य शिष्याला दिले जाते, ते कुत्र्याच्या कातड्याच्या पात्रांत ठेविलेल्या गाईच्या दुधाप्रमाणे अपवित्र होते. ५९ असतः शशशृङ्गादेः कारणं मार्गयन्ति ये ।
वन्ध्यापुत्रस्य पौत्रस्य स्कन्धमासादयन्ति ते ॥७।२२।९ सशाच्या शिंगासारख्या मुळीच नसलेल्या वस्तूंच्या कारणांचा जे शोध करीत बसतात, ते वन्ध्येच्या मुलाच्या नातवाच्या खांद्यावर बसतात असेंच म्हटले पाहिजे. ६० असतामपि संरूढं सौहार्द न निवर्तते ॥ ३॥८२४७
दुष्टांच्याही अंतःकरणांत एकदां प्रेम दृढ झाले, म्हणजे तें नाहींसें होणे शक्य नसतें.
For Private And Personal Use Only