Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
६१ असत्यभूतं तोयान्तश्चन्द्रव्योमतलादिकम् ।
बाला एवाभिवाञ्छन्ति मनोमोहाय नोत्तमाः॥४।४५/४७ पाण्यामध्ये पडलेलें चंद्राचे किंवा आकाशाचे असत्य प्रतिबिंब धरण्याचा मोह अज्ञ मुलांना पडतो, परंतु ज्ञात्या पुरुषाला असा मोह कधीही उत्पन्न होणार नाही. ६२ अस्माच्छास्त्रवराद्धोधा जायन्ते ये विचारितात ।
लवणैर्व्यञ्जनानीव भान्ति शास्त्रान्तराणि तैः॥७॥१६३।५४ मिठाच्या योगाने चटणी, भाजी यांना जशी रुचि येते त्याप्रमाणे या मुख्य शास्त्राच्या (योगवासिष्ठाच्या) विचाराने होणाऱ्या बोधामुळे इतर शास्त्रे सहज समजतात. ६३ अहंकारघने शान्ते तृष्णा नवतडिल्लता ।
शान्तदीपशिखावृत्त्या क्वापि यात्यतिसत्वरम् ॥१।१५।१३ अहंकाररूपी मेघ एकदा नाहीसा झाला, म्हणजे तृष्णारूपी वीज विझलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे कोठे नाहीशी होते तेही समजत नाही. ६४ अहंकारानुसंधानवर्जनादेव राघव ।
पौरुषेण प्रयत्नाच तीयते भवसागरः ॥४।३३।७० (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, मोठ्या प्रयत्नाने आणि धैर्याने अहंकाराला हद्दपार कर म्हणजे, तूं भवसागर तरून जाशील. ६५ अहंकाराम्बुदे क्षीणे दृश्यते चिद्दिवाकरः ॥ ५/६४।४५
अहंकाररूपी मेघ दूर झाला म्हणजे चैतन्यरूपी सूर्याचे दर्शन होते.
For Private And Personal Use Only