Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wmmmmmmmmm.niruvr
..
१८ सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ८६ आयुषः खण्डखण्डाश्च निपतन्तः पुनः पुनः ।
न कश्चिद्वत्ति कालेन क्षतानि दिवसान्यहो ।।७।९३१५१ हरहर ! काळ हा प्राण्यांच्या आयुष्याचे तुकडे तुकडे करून टाकीत असतो. पण प्रत्येक दिवशी अशा प्रकारें क्षय पावणारे आयुष्य संपत आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. ८७ आलस्यं यदि न भवेजगत्यनर्थः
को न स्याबहुधनको बहुश्रुतो वा । आलस्यादियमवनिः ससागरान्ता
संपूर्णा नरपशुभिश्च निधनैश्च ।। २।५।३० या जगामध्ये अनर्थकारक आळस नसता, तर प्रत्येक मनुष्य संपत्तिमान आणि विद्वान् झाला असता. परंतु आळसामुळे ही समुद्रवलयांकित संपूर्ण पृथ्वी नरपशूनी आणि निर्धन लोकांनी भरून गेली आहे. ८८ आशा हि लोहरज्जुभ्यो विषमा विपुला दृढा ।
कालेन क्षीयते लोहं तृष्णा तु परिवर्धते ॥ ६१९११६ आशा ही लोखंडी साखळदंडाहून अतिशय कठीण व मोठी मजबूत आहे. लोखंड कांहीं कालाने घासून घासून झिजून जाते, परंतु आशा मात्र उत्तरोत्तर वाढतच जाते. ८९ आस्थामात्रमनन्तानां दुःखानामाकरं विदुः।
अनास्थामात्रमभितः सुखानामाकरं विदुः ॥४।२७।२५ आसक्ति असणे ही केवळ अनंत दुःखांची खाण आहे. आणि आसक्ति नसणे ही स्थिति सर्व सुखांची खाण आहे.
For Private And Personal Use Only