Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
७१ आत्मज्ञानं विदुर्ज्ञानं ज्ञानान्यन्यानि यानि तु ।
तानि ज्ञानावभासानि सारस्थानवबोधनात् ।। ७।२११७ आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून बाकीची ज्ञाने म्हणजे ज्ञानाभास आहेत. कारण, त्यांच्या योगानें साररूप तत्त्व कळत नाही. ७२ आत्मवत्सर्वभूतानि परद्रव्याणि लोष्टवत् ।
स्वभावादेव न भयाद्यः पश्यति स पश्यति ॥५।५६।४९ जो भयामुळे नव्हे, तर स्वभावतःच सर्व भूतांना आपल्याप्रमाणे मानतो आणि परद्रव्याला मातीच्या ढेकळांप्रमाणे समजतो, तोच खरा तत्त्ववेत्ता होय. ७३ आत्मीयेष्वर्थजातेषु मिथ्यात्मसु सुतादिषु ।
बुद्धदेष्विव तोयानां न स्नेहस्तत्त्वदर्शिनाम् ।।७।१०२।१६ स्वकीय धनपुत्रादिकांवर ती मिथ्या असल्यामुळे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे तत्त्ववेत्त्यांची आस्था नसते. ७४ आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥७।१६२।१८
प्रत्येक मनुष्य आपणच आपला हितकर्ता होतो व अहितकर्ताहि होतो. ७५ आत्यन्तिकी विरसता यस्य दृश्येषु दृश्यते ।
स बुद्धो नाप्रबुद्धस्य दृश्यत्यागे हि शक्तता ॥ ७४५।३६ ज्याच्या ठिकाणी दृश्य वस्तूंविषयी पूर्णपणे वैराग्य असेल तोच ज्ञानी, असें जाणावें. कारण अज्ञ पुरुषाला दृश्य वस्तूंचा त्याग करण्याचे सामर्थ्य नसते.
For Private And Personal Use Only