Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
mmmmmmmwwwantr
४० अपि मेरुसमं प्राज्ञमपि शूरमपि स्थिरम् ।
तृणीकरोति तृष्णैका निमेषेण नरोत्तमम् ॥ १।१७५० एखादा मनुष्य मेरूप्रमाणे अटळ, विद्वान्, शूर आणि स्थिर बुद्धीचा असला तरी त्याला, तृष्णा क्षणामध्ये तृणाप्रमाणे तुच्छ करून सोडते. ४१ अपि शूरा अतिप्राज्ञास्ते न सन्ति जगत्त्रये ।
अविद्यया ये पुरुषा न नाम विवशीकृताः॥४॥४१॥३७
अविद्येच्या तडाक्यांत सांपडला नाही असा शूर किंवा महाबुद्धिमान् पुरुष त्रिभुवनांतहि विरळा. ४२ अपूर्वाह्लाददायिन्य उच्चैस्तरपदाश्रयाः ।
अतिमोहापहारिण्यः सूक्तयो हि महीयसाम् ॥ ५।४।५ थोर पुरुषांच्या सूक्ति अपूर्व आल्हाद देणान्या, अत्युच्चपदाला पोचविणा-या आणि अनर्थकारक मोह घालविणाऱ्या असतात. ४३ अपेक्षैव घनो बन्ध उपेक्षैव विमुक्तता ॥ ७।२६।३६
विषयांची अपेक्षा हाच दृढबंध होय. आणि उपेक्षा हाच मोक्ष होय. ४४ अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि ।
अपि वह्नयशनात्साधो विषमश्चित्तनिग्रहः ॥ १।१६।२४ समुद्र पिऊन टाकणे, मेरुपर्वत उपटून काढणे, किंवा अग्नि भक्षण करणे याच्यापेक्षांहि चित्ताचा निग्रह करणे हे जास्त कष्टतर आहे. ४५ अप्यापदि दुरन्तायां नैव गन्तव्यमक्रमे ॥ ४॥३२॥३९ केवढेंहि अनिवार संकट कोसळले तरी सन्मार्ग सोडून जाऊ नये.
For Private And Personal Use Only