Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१३ अद्यैव कुरु यच्छ्रेयो वृद्धः सन्किं करिष्यसि ।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ॥ ७|१६२।२०
आजच आपले कल्याण करून घे. तूं वृद्ध झाल्यावर काय करूं शकणार ? कारण वृद्धापकालीं आपलीं गात्रेंच आपणांला भारभूत होत असतात.
१४ अद्यैव न चिकित्सां यः करोति मरणापदः ।
संप्राप्तायां मृतौ मूढः करिष्यति किमातुरः ॥ ७।१०३।३८ मरणरूपी आपत्तीची चिकित्सा जो मूढ मनुष्य आजच्या आज करीत नाहीं, तो, मरणकाल प्राप्त झाला असतां, पीडित झाल्यावर काय करूं शकेल ?
१५ अनन्तं समतानन्दं परमार्थं विदुर्बुधाः ।
स येभ्यः प्राप्यते नित्यं ते सेव्याः शास्त्रसाधवः || २|६|३४
समत्वापासून होणाऱ्या शाश्वत आनंदाला ज्ञाते लोक परमार्थ म्हणतात. या परमार्थाची प्राप्ति शास्त्र व सत्पुरुष यांच्या योगानें होते, म्हणून निरंतर त्यांची सेवा केली पाहिजे.
१६ अनन्तमपतृष्णस्य स्वयमेव प्रवर्तते ।
ध्यानं गलितपक्षस्य संस्थानमिव भूभृतः || ७|४५।४४ पंख तुटून गेल्यामुळें पर्वत जसा एकाच जागीं स्थिर राहतो, तसा निरिच्छ पुरुष सहजच ध्यानस्थ होतो.
१७ अनन्ताः पितरो यान्ति यान्त्यनन्ताश्च मातरः । इह संसारिणां पुंसां वनपादपपर्णवत् || ५|२०|३३ ज्याप्रमाणे वनामधील वृक्षावर असंख्य पानें येतात आणि गळून जातात, त्याप्रमाणे या संसारांत आपले अनंत आईबाप होतात आणि जातात.
For Private And Personal Use Only