Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
साथश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२८ अनन्तानीह दुःखानि सुखं तृणलवोपमम् ।
नातः सुखेषु बन्नीयादृष्टिं दुःखानुबन्धिषु ॥ २।१३।२३ या जगांत सुख पहावें तर अत्यंत अल्प आहे, व दुःख पहावें तर अनंत आहे; यासाठी परिणामी दुःख देणाऱ्या विषयसुखाची आस्था बाळगू नये. १९ अनहंवेदनं सिद्धिरहंवेदनमापदः ॥ ६।९९।१३
'अहम् ' असें न जाणणे हीच सिद्धि व ' अहम् ' असें जाणणे ह्याच सर्व आपत्ति. २० अनागतानां भोगानामवाञ्छनमकृत्रिमम् ।
आगतानां च संभोग इति पण्डितलक्षणम् ॥ ४।४६१८ अप्राप्त विषयांची इच्छा स्वाभाविक नसणे आणि प्राप्त विषयांचा उपभोग घेणे हे पंडिताचे लक्षण आहे. २१ अनायासकदर्थिन्या गृहीते जरसा जने ।
पलाय्य गच्छति प्रज्ञा सपत्न्येवाहताङ्गना ॥ १।२२।५ आयास न पडतां दीन करून सोडणा-या जरेचा पगडा मनुष्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धि सवतीमत्सराने रागावलेल्या स्त्रीप्रमाणे त्याला सोडून निघून जाते. २२ अनार्तेन हि संमानो बहुमानो न बुध्यते ।
पूर्णानां सरितां प्रावृटपूरः स्वल्पो न राजते ॥४।२३।५४ पाण्याने नेहमीं भरलेल्या नद्यांना पावसाच्या लहान लहान सरींनी येणा-या पुराचे महत्त्व नाही, त्याप्रमाणे ज्याला दुःख कधी माहीत नाही, अशा मनुष्याचा सन्मान केला तर त्याला त्याची फारशी किंमत वाटत नाही.
For Private And Personal Use Only