Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९८
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
mananam
४६२ संजीवितं क्षिप्रमहं त्यजेयं
विषेण शस्त्रेण शितेन वापि । विषस्य दाता न तु मेऽस्ति कश्चि
च्छत्रस्य वा वेश्मनि राक्षसस्य ॥ ५।२८।१६ (रावणाच्या कारागृहांत त्रस्त झालेली सीता म्हणते.) विषाने किंवा तीक्ष्ण शस्त्राने मी आतां जीविताचा त्याग सत्वर करणार आहे, परंतु या राक्षसाच्या गृहांत विष किंवा शस्त्र कोणी मला आणून देईल, असा नाही. ४६३ स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्वर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥ २॥१११९ उत्कृष्ट गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम आंगच्या गुणांमुळे प्रजाजनांना-शरीराबाहेर संचार करणारा प्राणच की काय असा-प्रिय झाला. ४६४ सत्यधर्माभिरक्तानां नास्ति मृत्युकृतं भयम्॥६।४६।३४
सत्यधर्माचे ठिकाणी आसक्त झालेल्या लोकांना मृत्यूचें भय नसते. ४६५ सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः ।
सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम् ॥ २।१४७ सत्य हे एकपदरूप (ॐकाररूप ) ब्रह्म आहे; सत्याचे ठिकाणी धर्माची स्थिति आहे; अक्षय वेदही सत्याच्याच आश्रयाने आहेत. सत्यानें परब्रह्माची प्राप्ति होते. ४६६ सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्मः सदाश्रितः।।२।१०९।१३
सत्य म्हणजेच परमेश्वर होय, सज्जनांनी आश्रय केलेला धर्म सत्याचे ठिकाणी आहे.
For Private And Personal Use Only