Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४९० सुमुखं दुर्मुखी रामं वृत्तमध्यं महोदरी । विशालाक्षं विरूपाक्षी सुकेशं ताम्रमूर्धजा || ३|१७|९ प्रियरूपं विरूपा सा सुस्वरं भैरवस्वना । तरुणं दारुणा वृद्धा दक्षिणं वामभाषिणी || ३ | १७|१०
न्यायवृत्तं सुदुर्वृत्ता प्रियमप्रियदर्शना । शरीरजसमाविष्टा राक्षसी राममब्रवीत् ||३|१७|११
( रामाजवळ शूर्पणखा आली आणि बोलूं लागली. ) राम सुंदर मुखाचा, तर ती (शूर्पणखा ) दुर्मुखी, राम कृश उदराचा, तर ती महोदरी, राम विशालाक्ष, तर ती विरूपाक्षी; राम सुंदर केशांचा, तर ती ताम्रकेशी राम सुस्वरूप, तर ती कुरूप, रामाचा सुस्वर तर तिचा कर्कश स्वर, राम तरुण तर ती क्रूर व वृद्ध; राम चतुर भाषण करणारा; तर ती दुर्भाषण करणारी; राम न्यायानें वागणारा, तर ती अत्यन्त दुर्वृत्तः राम सर्वोस प्रिय, तर ती सर्वास अप्रिय, अशी ती कामपीडित ( शूर्पणखा ) राक्षसी रामाला म्हणाली. ( या ठिकाणीं राम व शूर्पणखा यांना दिलेलीं विशेषणें परस्पर विरुद्ध आहेत. )
४९१ सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः || ३|३७|२
( मारीच रावणाला म्हणतो. ) हे राजा, ( हिताहिताचा विचार न करितां केवळ ) सतत मधुर भाषण करणारे पुरुष सुलभ आहेत; परंतु अप्रिय जरी असले तरी हितकारक भाषण करणारा वक्ता आणि तें ऐकून घेणारा श्रोता हे दुर्लभ आहेत.
For Private And Personal Use Only