Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१००
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४७३ समुत्पतितमेघस्य वीचिमालाकुलस्य च ।
विशेषो न द्वयोरासीत्सागरस्याम्बरस्य च ॥ ६।४।१२० उद्भवलेल्या मेघांनी युक्त असलेले आकाश आणि लाटांच्या समुदायांनी व्याप्त होऊन गेलेला समुद्र द्यांमध्ये काहीएक भेद दिसेनासा झाला. ४७४ संपृष्टेन तु वक्तव्यम् ॥३॥४०९
विचारले असतां बोलावें. ४७५ संप्राप्तमवमानं यस्तेजसा न प्रमार्जति ।
कस्तस्य पौरुषेणार्थो महताप्यल्पचेतसः ॥ ६।११५।६ - (राम सीतेला म्हणतो.) अपमान झाला असतां जो तेजाच्या योगाने त्याचे परिमार्जन करीत नाही, त्या मंदमति पुरुषाचा पराक्रम जरी मोठा असला तरी त्याचा काय उपयोग ? ४७६ सरितां तु पतिः स्वल्पां मर्यादां सत्यमन्वितः।
सत्यानुरोधात्समये वेलां स्वां नातिवतेते ॥ २॥१४॥६ समुद्र सत्यव्रत असल्या करणाने सत्याचा त्याग होईल, या भीतीने ( चंद्रोदयकालीं ) स्वल्प मर्यादा उलंध्य असूनही तो स्वतःच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाही. ४७७ सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः ।
शूराःशरण्या:सौमित्रे तिर्यग्योनिगतेष्वपि ॥३॥६८।२४ ( सीतेला सोडविण्यासाठी रावणापाशी युद्ध करीत असतां जटायु पक्षी मरण पावला हे पाहून राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, शूर व शरण जाण्यास योग्य असे धर्माने वागणारे साधुजन खरोखर सर्वत्र म्हणजे तिर्यग्योनि प्राप्त झालेल्या प्राण्यांतही दृष्टीस पडतात.
For Private And Personal Use Only