Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४३६ विनाशे बहवो दोषा जीवन्प्रामोति भद्रकम् ।
तस्मात्प्राणान्धरिष्यामि ध्रुवो जीवति संगमः॥५।१३।४५ ( लंकेंत सीतेचा शोध लागेना त्यावेळी मारुति म्हणतो.) प्राणत्याग करण्यांत पुष्कळच दोष असून पुरुष जिवंत राहिला असतां त्याचे कधीतरी कल्याण होतेच. म्हणून मी प्राण धारण करून राहीन. कारण पुरुष कायम राहिल्यास त्याला इष्ट असलेली गोष्ट कधीतरी निःसंशय प्राप्त होतच असते. '४३७ विनीतविनयस्यापि प्रकृतिने विधीयते ।
प्रकृतिं गूहमानस्य निश्चयेन कृतिधुवा।।७।५९प्र. २२२६ ज्याला विनयाचे शिक्षण मिळाले आहे, त्यालाही मूळस्वभाव टाकितां येत नाही. ह्यास्तव ( दुष्ट ) स्वभाव जरी एखाद्याने बाहेर दाखविला नाही, तरी ( दुष्ट ) कृत्य त्याच्या हातून होणार हे ठरलेलेच आहे. ४३८ विलीयमानैर्विहगैनिमीलद्भिश्च पङ्कजैः।
विकसन्त्या च मालत्या गतोऽस्तं ज्ञायते रविः।।४।२८.५२ सांप्रत पक्षी आपापल्या घरट्यांत जाऊ लागले आहेत, सूर्यविकासी कमलें मिटली आहेत, आणि मालती प्रफुल्लित झाली आहे, यावरून सूर्य अस्तास गेला आहे असे समजतें. ४३९ विव्यथे भरतो तीव्रव्रणे तुद्येव सूचिना ॥ २७५।१७
(कौसल्येनें निर्भर्त्सना केली असतां ) भरत, तीव्र व्रणाचे ठिकाणी सुईनें टोचावें, त्याप्रमाणे व्यथित झाला.
For Private And Personal Use Only