Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४४९ शुभकृच्छुभमामोति पापकृत्पापमश्नुते ।
विभीषणः सुखं प्राप्तस्त्वं प्राप्तः पापमीदृशम् ॥६।१११।२६ ( मंदोदरी वध पावलेल्या रावणाला उद्देशून म्हणते. )
पुण्यकर्म करणान्याला कल्याणप्राप्ति होते, तर पापकर्म करणान्याला पापफळ भोगावे लागते. बिभीषणाला सुखाची प्राप्ति झाली, आणि ( त्याच्या उलट ) तुला अशी वाईट स्थिति प्राप्त झाली आहे. ४५० शुष्ककाष्ठेर्भवेत्कार्य लोष्टैरपि च पांसुभिः ।
नतु स्थानात्परिभ्रष्टैः कार्य स्याद्वसुधाधिपः॥३।३३।१८ __ शुष्क काष्ठांनी, मातीच्या ढेकळांनी, तसेंच रजःकणांनीही कार्ये होतात. परंतु राजा एकदां स्थानभ्रष्ट झाला म्हणजे त्याजपासून कोणतेही कार्य होत नाही. ४५१ शूराश्च बलवन्तश्च कृतास्त्राश्च रणाजिरे ।
कालाभिपन्नाः सीदन्ति यथा वालुकसेतवः।। ३।६९।५० शूर असोत, बलवान् असोत, अथवा रणभूमीवर अस्त्रविद्यानैपुण्य दाखविणारे असोत, कालाने व्याप्त झाले असतां ते वाळूच्या सेतूप्रमाणे नाश पावतात. ४५२ शूरेण धनदभ्रात्रा बलैः समुदितेन च ।
अपोह्य रामं कस्माच्चिदारचौर्य त्वया कृतम् ॥५।२२।२२ (सीता रावणाला म्हणते.) सैन्यांच्या योगाने प्रबल झालेला तूं कुबेराचा भ्राता मोठा शूर पडलास; म्हणूनच मारीच राक्षसाच्या मायेनें रामाला दूर घालवून स्त्रीचौर्य करण्याचे शौर्य तुझ्या हातून घडले.
For Private And Personal Use Only