Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ८३ ३९७ यस्यार्थाः स च विक्रान्तो यस्यार्थाः स च बुद्धिमान् । । यस्यार्थाः स महाबाहुर्यस्यार्थाः स गुणाधिकः॥६।८३३३६ , ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच पराक्रमी; ज्याच्याजवळ धन आहे, तोच बुद्धिमान. ज्याच्याजवळ द्रव्य आहे, तो महाबाहु आणि तोच अधिक गुणवान्. ३९८ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति । - यथोरगस्त्वचं जीर्णा स वै पुरुष उच्यते ॥ ५।५५।६ __ सर्प जशी जीर्ण त्वचा सोडतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेल्या क्रोधाला जो क्षमेने घालवितो, तोच खरोखर पुरुष म्हटला आहे. ३९९ यः स्वपक्षं परित्यज्य परपक्षं निषेवते । ___ स स्वपक्षे क्षयं याते पश्चात्तैरेव हन्यते॥६।८७१६ (इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो. ) जो स्वकीय पक्ष सोडून परपक्षाचा स्वीकार करितो, तो, स्वपक्ष नाशाला गेला असतां, त्याच्या (परपक्षा) कडून मारला जातो. ४०० या त्वं विरहिता नीता चलचित्तेन रक्षसा।
दैवसंपादितो दोषो मानुषेण मया जितः॥६।११५१५ ( रावणवधानंतर राम सीतेला म्हणतो.) चंचल चित्ताच्या राक्षसाने । रावणाने) तुला एकटी असतांना नेलें, हा अनर्थ दैवामुळे घडला व तो मी मनुष्याच्या पराक्रमानें नाहींसा केला. ४०१ यादृशं कुरुते कर्म तादृशं फलमश्नुते ॥ ७१५।२४
ज्याप्रकारचे कर्म मनुष्य करितो, त्याचप्रकारचे फळ त्याला मिळते. ४०२ ये तु सभ्याः सदा ज्ञात्वा तूष्णीं ध्यायन्त आसते । __यथाप्राप्तं न ब्रुवते ते सर्वेऽनृतवादिनः ॥७.५९प्र.३१३४
जे सभासद एकादी गोष्ट जाणूनही स्वस्थ बसून राहतात, बोलणें प्राप्त झाले असतांही बोलत नाहीत, ते खोटे बोलणारे होत.
For Private And Personal Use Only