Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३८८ यमिच्छेन्नरकं नेतुं सपुत्रपशुबान्धवम् ।
देवेष्वधिष्ठितं कुर्याद्गोषु तं ब्राह्मणेषु च ॥७५९प्र.२।४८ ज्याला पुत्र, पशु, बांधव या सर्वांसह नरकांत पाडण्याची आपली इच्छा असेल, त्याला देवांवर, ब्राह्मणांवर किंवा गाईवर अधिकारी नेमावें. ३८९ यस्तु राजा स्थितोऽधर्मे मित्राणामुपकारिणाम् ।
मिथ्या प्रतिज्ञां कुरुते को नृशंसतरस्ततः॥ ४॥३४८ जो राजा अधर्माने वागणारा असून, उपकार करणाऱ्या मित्रांपाशी खोटी प्रतिज्ञा करितो, त्याहून अत्यंत दुष्ट असा कोण बरें आहे ? ३९० यस्तु हित्वा मतं भर्तुः स्वमतं संप्रधारयेत् । ___ अनुक्तवादी दूतः सन् स दूतो वधमहेति ॥ ६२०१९
जो दूत आपल्या धन्याचे मत सोडून आपलेच मत प्रतिपादन करितो, तो दूत धन्याने न सांगितलेले बोलत असल्यामुळे वधास पात्र आहे. ३९१ यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना ।
इति जानन्परां प्रीतिं गच्छ राम मया सह ॥२।३०।१८ (सीता रामाला म्हणते.) आपल्याबरोबर जी स्थिति मला प्राप्त होईल तो माझा स्वर्ग आहे, आणि आपला वियोग होऊन कसलीही स्थिति जरी प्राप्त होणार असली, तरी तो मला नरक आहे; हे माझें आपल्या ठिकाणी असलेले पराकाष्ठेचे प्रेम जाणून हे राम, आपण मला बरोबर घेऊन वनांत चला. ३९२ यस्मात्पश्यन्ति दूरस्थान्सर्वानर्थान्नराधिपाः ।
चारेण तस्मादुच्यन्ते राजानो दीर्घचक्षुषः ॥३।३३।१० राजेलोक दूरदूरच्या सर्व गोष्टी हेरांकडून जाणून घेतात म्हणून त्यांना 'दीर्घदृष्टि' असें म्हणतात.
रा. सु. ६
For Private And Personal Use Only