Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४०८ यो हि विक्लवया बुद्धया प्रसरं शत्रवे दिशेत् ।
स हतो मन्दबुद्धिः स्याद्यथा कापुरुषस्तथा॥७१६८।२० जो अविचाराने शत्रूला अवसर देतो, त्या मंदबुद्धि पुरुषाचा दुर्बल पुरुषाप्रमाणे वध होतो. ४०९ रकारादीनि नामानि रामत्रस्तस्य रावण ।
रत्नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ॥३॥३९।१८ (मारीच म्हणतो. ) हे रावणा, रामाची जरब बसून गेल्यामुळे रकाराने ज्या नांवांचा आरंभ होतो, ती नांवें म्हणजे उदाहरणार्थ, रत्ने, रथ इत्यादि ही माझे ठिकाणी भय उत्पन्न करितात. ४१० रक्ष्या हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिनः ॥२॥१००१४८ __राजाने आपल्या देशांत राहणा-या सर्व लोकांचे धर्माने परिपालन केले पाहिजे. ४११ राघवस्य प्रियां भार्यामधिगन्तुं त्वमिच्छसि ।
अवसृज्य शिलां कण्ठे समुद्रं तर्तुमिच्छसि ।।३।४७१४१ (सीता रावणाला म्हणते.) रामाची प्रिय भार्या प्राप्त होण्याची तूं इच्छा करीत आहेस; म्हणजे गळ्यामध्ये शिळा बांधून समुद्र तरून जाण्याचेच तूं मनामध्ये आणिलें आहेस. ४१२ राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असवृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ॥ ७७३।१६ अन्यायाने पाळलेल्या प्रजांचा राजाच्या दोषांनी नाश होतो. राजा दुर्वर्तन करणारा निघाल्यास प्रजा अकालीं मरतात. ४१३ राजमूला प्रजाः सर्वा राजा धर्मः सनातनः७।५९प्र.३३३८
सर्व प्रजा राजमूलक असतात. राजा म्हणजे सनातन धर्म होय.
For Private And Personal Use Only