Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३०४ पीडाकरममित्राणां यच्च कर्तव्यमेव तत् ॥ ६।८।२९
शत्रुना जें जें म्हणून पीडादायक आहे, तें तें (त्यांत पाप असले तरी ) कर्तव्यच होय. ३०५ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितॄन्यः पाति सर्वतः॥२।१०७।१२ 'पुत् । नामक नरकापासून पित्याचे रक्षण करितो, अथवा (स्वर्गलोकप्राप्तिकारक कर्मानी ) जो पितरांचें नित्यशः रक्षण करितो, त्यासच 'पुत्र ' असे म्हणतात. ३०६ पुरुषस्य हि लोकेस्मिन् शोकः शौर्यापकर्षणः॥६।२।१३
या लोकीं शोक हा पुरुषाच्या शौर्याचा नाश करणारा आहे. ३०७ पूर्व कृतार्थो मित्राणां न तत्प्रतिकरोति यः।
कृतमः सर्वभूतानां स वध्यः प्लवगेश्वर ॥४।३४।१० ( लक्ष्मण सुग्रीवाला म्हणतो.) हे वानरश्रेष्ठा, पूर्वी मित्रांच्या हातून स्वतःचे कार्य झाले असतांही जो त्या मित्रांचे उपकार फेडीत नाही, असा कृतघ्न पुरुष सर्व लोकांस वध्य आहे.. ३०८ पूर्वापकारिणं हत्वा न ह्यधर्मेण युज्यते ॥२९६२४ __ ज्याने प्रथम अपकार केला आहे, अशाचा वध केला असतां अधर्म घडत नाही. ३०९ पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः॥७५३।६ जो राजा पौरजनांची कार्ये प्रत्यही करीत नाही, तो वायूचा संचार नसलेल्या घोर नरकांत पडतो यांत संशय नाही.
For Private And Personal Use Only