Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३१० पौरा ह्यात्मकृतादुःखाद्विप्रमोच्या नृपात्मजैः ।
न तु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासिनः॥२।४६।२३ (राम लक्ष्मणाला सांगतो.) आपणांकरितांजर नगरवासी लोकांना दुःख होत असेल, तर राजपुत्रांनी त्यांना दुःखांतून मुक्त केलें पाहिजे. आपल्याकरितां लोकांना दुःख होऊ देणे खरोखर योग्य नाही. ३११ पौरुषेण तु यो युक्तः स तु शूर इति स्मृतः॥६७१।६०
ज्याच्या आंगीं पराक्रम आहे त्यालाच शूर असे म्हणतात. ३१२ प्रतिग्रहो हि विप्रेन्द्र क्षत्रियाणां सुगर्हितः॥७७६।३५
(राम अगस्त्य मुनींना म्हणतो.) हे ब्राह्मणश्रेष्ठा, क्षत्रियांस प्रतिग्रह म्हणजे अत्यंत निंद्य होय. ३१३ प्रतिज्ञायां हि नष्टायां धर्मो हि विलयं व्रजेत्॥७।१०६।९
प्रतिज्ञा नष्ट झाली असतां धर्म लयाला जातो. ३१४ प्रतिवक्तं प्रकृष्टे हि नापकृष्टस्तु शक्नुयात् ।। ४।१८।४७
(वाली रामाला म्हणतो.) श्रेष्ठाच्यापुढे उत्तर देण्यास कनिष्ठ समर्थ होणार नाही. ३१५ प्रत्यगारमिवायान्ती सवत्सा वत्सकारणात् ।
बद्धवत्सा यथा धेनू राममाताभ्यधावत ॥ २॥४०॥४३ (राम वनवासाला निघाला असता त्याच्यामागे कौसल्या जाऊं लागली. ) घरांत वासरूं बांधून ठेविले असले म्हणजे गाय परत येतांना वासराकरितां जशी धावत धावत घरी येते, तशी राममाता कौसल्या रामाच्या मागोमाग धावू लागली.
For Private And Personal Use Only