Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३५८ यः कृते हन्यते भर्तुः स पुमान् स्वर्गमृच्छति॥६९२९
जो स्वामिकार्यासाठी वध पावतो, तो पुरुष स्वर्गाला जातो. ३५९ यः खल्वपि वनं प्राप्य मृगव्यालनिषवितम् ।
न पिबेन्मधु संप्राप्य स नरो बालिशो भवेत् ॥ ६।१३।२' मृग आणि सर्प यांनी आश्रय केलेले दुर्गम वन प्राप्त झाल्यावर मध हाती आला असता, जो त्याचे सेवन करीत नाहीं तोमूर्ख पुरुष होय.. ३६० यः पश्चात्पूर्वकार्याणि कर्माण्यभिचिकीर्षति ।
पूर्व चापरकार्याणि स न वेद नयानयौ ॥६।१२।३२ पूर्वी कर्तव्य असलेल्या कर्माचा जो मागाहून विचार करितो आणि नंतरची कामें पूर्वी करूं पाहतो. त्याला न्याय अन्याय कांहींच समजत नाही. ३६१ यतो मूलं नरः पश्येत्प्रादुर्भावमिहात्मनः ।
कथं तस्मिन्न वर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ॥ २॥१८॥१६ (राम कैकेयीला म्हणतो. ) जो (पिता) आपल्या जन्मास मूळ कारण, ज्यापासून आपण जन्माला आलों,व म्हणून जो आपले प्रत्यक्ष दैवत, त्या पित्याच्या मनाप्रमाणे कोणता बरें पुरुष वागणार नाही ? ३६२ यत्कर्तव्यं मनुष्येण धर्षणां प्रतिमार्जता।
तत्कृतं रावणं हत्वा मयेदं मानकाडिणा॥६।११५।१३ ( राम सीतेला म्हणतो. ) अपमानाचे परिमार्जन करणान्या मनुष्याच्या हातून जें होण्यासारखे आहे, ते मी लौकिकाची. चाड बाळगणान्या रामाने रावणाचा वध करून केले आहे. ३६३ यत्कृत्वा न भवेद्धर्मो न कीर्तिने यशो ध्रुवम् ।
शरीरस्य भवेत्खेदः कस्तत्कर्म समाचरेत् ॥ ३॥५०१९ (जटायु रावणाला म्हणतो.) जे केल्याने धर्म, कीर्ति, अढळ यश यांपैकी काहीएक प्राप्त होत नाही, उलट शरीराला क्लेश मात्र होतात त्या कर्माचे आचरण कोण बरें करील ?
For Private And Personal Use Only