Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३५३ मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् || १/२/१५
(वाल्मीकि मुनींच्या मुखांतून निघालेले सहज उद्गार. ) हे निषादा, ज्याअर्थी या क्रौंच पक्ष्यांच्या जोडप्यापैकीं काममोहित झालेल्या एकाचा ( नराचा ) तूं वध केला आहेस, त्याअर्थी तुझे पाय फार वर्षे भुईला लागणार नाहींत. ( तूं फार दिवस जगणार नाहींस. ) ( या श्लोकाचा अन्य रीतीनें आशीर्वादपर खालीलप्रमाणें अर्थ करितां येतो. हे मा-निषाद-लक्ष्मीचे निवासस्थानभूत रामचंद्रा ! मंदोदरी व रावण या दंपत्यांतून रावणाचा तुम्हीं वध केला, त्याअर्थी अनेक वर्षेपर्यंत अखंड प्रतिष्ठेस-ऐश्वर्यास आपण प्राप्त व्हावें. ) ३५४ मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।
अमितस्य तु दातारं भर्तारं का न पूजयेत् || २|३९| ३० पिता भ्राता किंवा पुत्र यांनी कितीही दिले, तरी तें परिमितच असावयाचें: अपरिमित देणारा म्हणजे एक पतिच होय. अशा पतीची सेवा कोणती स्त्री करणार नाहीं ? ३५५ मुमूषूणां तु सर्वेषां यत्पथ्यं तन्न रोचते || ३ |५३।१८ जे मरणोन्मुख झालेले असतात, त्यांना पथ्य म्हणून आवडतच नाहीं. ३५६ मूलमर्थस्य संरक्ष्यमेष कार्यविदां नयः ।
मूले हि सति सिध्यन्ति गुणाः सर्वे फलोदयाः || ४ | ६५/२५ कोणत्याही गोष्टीचें मूळ रक्षण करून ठेविलें पाहिजे, असा कार्यवेत्त्या पुरुषांचा न्याय आहे. कारण मूळ जर कायम असेल तर इतर सर्व उदयोन्मुख गुण सिद्धीस जातात. ( सर्व किरकोळ गोष्टी सिद्ध होतात. )
३५७ मृदुर्हि परिभूयते । २।२१।११
जो मृदु असतो, त्याचा ( सर्वत्र ) पराजय व्हावयाचाच. ( मऊ: सांपडलें म्हणजे लोक कोपरानें खणूं लागतात. )
For Private And Personal Use Only