Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३४७ मन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका ।
यत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेर्दश ॥ २॥५३।२२ ( राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, ( माझ्या मातेने पालन करून बोलण्यास शिकविलेली) साळुकी माझ्यापेक्षा माझ्या मातेवर अधिक प्रीति करणारी आहे असे मला वाटते. कारण 'हे शुका, शत्रूच्या पायाला दंश कर ' असें तरी त्या साळुकीचं वाक्य तिच्या कानावर पडत असतें. ( परंतु शत्रूचा पराजय करण्यासंबंधाचे तसे नुसते माझे शब्द देखील तिच्या कानावर पडत नाहीत.) ३४८ ममैव नूनं मरणं न विद्यते
न चावकाशोऽस्ति यमक्षये मम । यदन्तकोऽद्यैव न मां जिहीर्षति
प्रसह्य सिंहो रुदती मृगीमिव ॥ २।२०५० (कौसल्या म्हणते.) शोक करीत बसलेल्या हरिणीला एकाएकी उचलून नेणाऱ्या सिंहाप्रमाणे मृत्यु मला नेण्याचे मनांत आणीत नाही, यावरून मी खरोखर अमर आहे, व यमाच्या घरी मला जागा नाही हेच खरें. ३४९ मयैकेन तु निर्यक्तः परिमच्यस्व राघव ।
मां हि भूतबलि दत्त्वा पलायस्व यथासुखम्॥३॥६९।३९
अधिगन्तासि वैदेहीमचिरेणेति मे मतिः ॥ ३॥६९।४० (कबंध राक्षसाच्या तावडीत सांपडल्यावर लक्ष्मण रामाला म्ह्णाला. ) हे राघवा, माझ्या एकट्याचा या राक्षसाला ( कबंधाला ) बलि देऊन आपणाला सोडीव, आणि येथून सुखाने पळून जा. लवकरच जानकीची तुला प्राप्ति होईल, असे मला वाटते.
For Private And Personal Use Only