Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३६४ यत्र रामो भयं नात्र नास्ति तत्र पराभवः ।।२।४८११५
ज्या ठिकाणी राम आहे त्याठिकाणी भय नाहीं व पराजयही नाही. ३६५ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे ।
समेत्य तु व्यपेतायां कालमासाद्य कंचन ॥२।१०५।२६ एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च वसूनि च ।
समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः।।२।१०५।२७ 'ज्याप्रमाणे महासागरामध्ये एक काष्ठ आणि दुसरें काष्ठ यांचा समागम होतो, नंतर काही वेळाने त्यांचा वियोग होतो, त्याचप्रमाणे भार्या, पुत्र, भाऊबंद व संपत्ति यांचा समागम होत असून नंतर ती एकमेकांपासून दूर धावू लागतात. कारण, ह्यांचा वियोग हा ठरलेलाच आहे. ३६६ यथागारं दृढस्थूणं जीणं भूत्वोपसीदति ।
तथावसीदन्ति नरा जरामृत्युवशं गताः॥२॥१०५।१८ घराचे खांब बळकट असले, तरी ते घर जीर्ण होऊन नाश पावतें, त्याप्रमाणे मनुष्ये जरा व मृत्यु यांच्या स्वाधीन होऊन नाश पावतात. ३६७ यथा तव तथान्येषां रक्ष्या दारा निशाचर ।
आत्मानमुपमां कृत्वा स्वेषु दारंषु रम्यताम् ।।५।२११७ (सीता रावणाला म्हणते.) हे राक्षसा, जशा तुझ्या स्त्रिया तुला संरक्षणीय आहेत तशाच दुसन्यांच्याही आहेत, म्हणून जें आपणाला दुःख तेंच दुसऱ्याला दुःख, असे समजून तूं स्वतःच्याच स्त्रीजनांचे ठिकाणी रममाण हो. ३६८ यथा दृष्टिः शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते । _तथा नरेन्द्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयोः ॥ २०६७।३३
ज्याप्रमाणे शरीराचे हिताहित पाहण्याविषयी दृष्टि नेहमीं तत्पर असते, त्याचप्राणे सत्य आणि धर्म यांची प्रवृत्ति करणारा राजा राष्ट्राच्या हिताहिताविषयीं नेहमी दक्ष असतो.
For Private And Personal Use Only