Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२२७ न मे दुःखं प्रिया दूरे न मे दुःखं हृतेति च ।
एतदेवानुशोचामि वयोऽस्या ह्यतिवर्तते ॥ ६।५।५ (राम लक्ष्मणाला म्हणतो) प्रिया दूर झाली म्हणून मी शोक करीत नाही किंवा तिचे शत्रूने हरण केले म्हणूनही मला दुःख नाही; परंतु हिचा आयुष्यकाल फुकट जात आहे, म्हणून मला दुःख होत आहे. २२८ नयनाभ्यां प्रसुप्तो वा जागर्ति नयचक्षुषा ।
व्यक्तक्रोधप्रसादश्च स राजा पूज्यते जनः ॥३॥३३॥२१ (शूर्पणखा रावणाला म्हणते) डोळे मिटून निजला तरी न्यायदृष्टि उघडी ठेवून जो जागत असतो, आणि योग्य ठिकाणींच ज्याचा क्रोध व कृपा ही व्यक्त होत असतात, त्याच राजाला लोक मान देत असतात. २२९ न राज्यभ्रंशनं भद्रे न सुहृद्भिर्विनाभवः । __ मनो मे बाधते दृष्ट्वा रमणीयमिमं गिरिम् ॥ २९४३ (राम चित्रकूट पर्वताची शोभा सीतेला दाखवितो ) हे कल्याणि, हा रमणीय पर्वत अवलोकन करून राज्यभ्रंश आणि सुहृदांचा वियोग यांच्या योगाने माझ्या मनाला पीडा होत नाही. २३० न राम परदारान्स चक्षुभ्यामपि पश्यति ॥ २७२।४८
(कैकेयी भरताला म्हणते) तो राम परस्त्रीकडे कधी डोळ्यांनी पहात देखील नाही. २३१ नवमासधृतं गर्भ भास्करस्य गभस्तिभिः ।
पीत्वा रसं समुद्राणां द्यौः प्रसूते रसायनम् ॥ ४॥२८३ (माल्यवान् पर्वतावर राहात असतां राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) सूर्यकिरणांच्या योगानें समुद्राचे पाणी शोषून घेऊन (कार्तिकादि ) नऊ महिनेपर्यंत धारण केलेला व रसायनाप्रमाणे लोकांच्या जीवनास कारण होणारा जलरूप गर्भ आकाशरूपी स्त्री टाकून देत आहे.
For Private And Personal Use Only