Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४७
२२२ न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति ।
एवमेव नरव्याघ्रः परलीढं न मन्यते ॥२।६१।१६ (कौसल्या दशरथाला म्हणते) ज्याप्रमाणे व्याघ्र दुसन्याने आणिलेलें भक्ष्य खाण्याची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे श्रेष्ठ पुरुष दुसन्याचे उष्टें कधी घेत नाही. २२३ न पापानां वधे पापं विद्यते शत्रुसूदन ॥५।१२।११
(रावण बिभीषणाला म्हणतो) हे शत्रुनाशका, पाप्याचा वध करण्यांत पाप कधीही लागत नाही. २२४ न पिता नात्मजो वात्मा न माता न सखीजनः।
इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा ॥२।२७६ ( सीता रामाला म्हणते ) इहलोकीं, आणि परलोकीही स्त्रियांस पिता, पुत्र, आत्मा (स्वतः ती,) माता, किंवा सख्या यांतून एकही गति नसून त्यांची गति म्हणजे एक पतिच होय. २२५ न पित्र्यमनुवर्तन्ते मातृकं द्विपदा इति ।
ख्यातो लोकप्रवादोऽयं भरतेनान्यथा कृतः॥३॥१६॥३४ मनुष्ये पित्याच्या स्वभावाचे अनुकरण न करितां मातेच्या स्वभावाचे अनुकरण करितात, म्हणून लोकांत प्रसिद्धि आहे, ती भरताने खोटी करून दाखविली. (भरत कैकेयीच्या वळणावर गेला नाही.) २२६ न बुद्धिपूर्व नाबुद्धं स्मरामीह कदाचन ।
मातृणां वा पितुवोहं कृतमल्प च विप्रियम् ।।२।२२।८ ( राम लक्ष्मणाला म्हणतो) मातांना अथवा पित्याला अप्रिय असलेली क्षुल्कही गोष्ट समजून अथवा न समजून कधीही केल्याचे मला स्मरत नाही.
For Private And Personal Use Only