Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २६८ नाराजके जनपदे योगक्षेमः प्रवर्तते ॥ २०६७।२४
राजहीन देशांत लोकांचे योगक्षेम सुखाने चालत नाहीत. २६९ नाराजके जनपदे स्वकं भवति कस्यचित् ।
मत्स्या इव जना नित्यं भक्षयन्ति परस्परम् ।।२।६७४३१ राजहीन देशांत कोणाचाही जीव स्वस्थ नसतो. मत्स्य जसे परस्परांचे भक्षण करीत असतात, तसेंच अशा देशांत लोक परस्परांस भक्षण करितात. २७० नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले ।।
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥४।६।२२ (सीतेचे अलंकार ओळखण्यास सांगितलें असतां लक्ष्मण रामाला म्हणतो) सीतेची बाहुभूषणे मला ठाऊक नाहींत, व कुंडलेंही माहीत नाहीत. परंतु नेहमी सीतेच्या पायां पडण्याचा प्रसंग येत असल्यामुळे तोरड्यांची मात्र मला ओळख पटत आहे. २७१ नित्यमन्योन्यसंहृष्टा व्यसनेष्वाततायिनः।
प्रच्छन्नहृदया धोरा ज्ञातयस्तु भयावहाः ॥ ६।१६।५ (रावण विभीषणाला म्हणतो) एकमेकांच्या विपत्तीमध्ये आनंद मानून आपला आशय गुप्त ठेवणारे हे क्रूर आततायी ( एकमेकांच्या घरावर अग्नि ठेवणारे ) भाऊबंद फारच भयंकर आहेत. २७२ निमित्तं लक्षणं स्वमं शकुनिस्वरदर्शनम् ।
अवश्यं सुखदुःखेषु नराणां परिदृश्यते ॥ ३५२।२ सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग यावयाचे असल्यास स्वप्न अथवा पक्ष्यांचा स्वर असें कांहीं तरी सूचक चिन्ह मनुष्यांच्या दृष्टीस अवश्य येत असते. २७३ नियुक्तैमन्त्रिभिर्वाच्यो ह्यवश्यं पार्थिवो हितम् ४१३२।१८ नियोजित मंत्र्यांनी राजाला हिताच्या गोष्टी अवश्य सांगाव्या.
For Private And Personal Use Only