Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
- २८८ परत्रवासे हि वदन्त्यनुत्तमं तपोधनाः सत्यवचो हितं नृणाम् || २।११।२९
( कैकेयी दशरथाला म्हणते. ) परलोकीं वास्तव्य करण्यामध्ये मनुष्यांना सत्यवचन अत्यंत हितकारक होतें असें तपोधन
म्हणत असतात.
२८९ परदाराभिमर्शात्तु नान्यत्पापतरं महत् || ३ | ३८ | ३० परस्त्रीगमनापेक्षां अधिक असें दुसरें कोणतेंही महापातक नाहीं. - २९० परदारावरोधस्य प्रसुप्तस्य निरीक्षणम् ।
इदं खलु ममात्यर्थं धर्मलोपं करिष्यति ।। ५।११।३९
( सीतेचा शोध लावण्यासाठीं रावणाच्या अंतःपुरांत शिरलेला मारुति म्हणतो. ) अंतःपुरांत निजलेल्या परस्त्रियांचें अवलोकन, ही गोष्ट माझ्या धर्माचा अतिशयेंकरून लोप करील. २९१ परं निर्वेदमागम्य न हि नोन्मीलनं क्षमम् ॥ ४४९/८
( अंगद वानरांना म्हणतो. ) मनामध्यें अतिशय खिन्न होऊन उद्योग सोडून देणें योग्य नाहीं.
२९२ परमापद्गतस्यापि धर्मे मम मतिर्भवेत् ।। ७।१०।३०
( विभीषणानें ब्रह्मदेवाजवळ वर मागितला. ) मी पराकाष्ठेच्या विपत्तींत जरी सांपडलों तरी धर्माकडेच माझी बुद्धि असावी. २९३ परस्पर्शात्तु वैदेह्या न दुःखतरमस्ति मे ।
पितुर्विनाशात्सौमित्रे स्वराज्यहरणात्तथा ||३|२| २१
( विराध राक्षसानें सीतेला उचलून नेलें हें पाहून राम म्हणतो. ) हे लक्ष्मणा, सीतेला झालेला परपुरुषाचा स्पर्श, ह्याहून अधिक दुःखदायक असें मला कांहीं वाटत नाहीं. पित्याचें मरण आणि स्वराज्यहरण ह्यांहूनही तें दुःख अधिक आहे
For Private And Personal Use Only