Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
wwww
२७९ नैकान्तविजयो युद्धे भूतपूर्वः कदाचन । - परैर्वा हन्यते वीरः परान्वा हन्ति संयुगे ॥६।१०९।१८
युद्धांत निश्चयात्मक जयच होतो, असें पूर्वी कधीही झाले नाही. वीरपुरुष रणांगणावर शत्रूकडून मारला जातो, किंवा शत्रुला मारितो. २८० नैतच्चित्रं नरव्याघ्र शीलवृत्तविदां वरे ।
यदायं त्वयि तिष्ठेत्तु निनोत्सृष्टमिवोदकम्॥२।११३।१६ ( भरद्वाज मुनि म्हणतात हे भरता, ) तूं नरश्रेष्ठ आणि उत्तम प्रकारचा शीलवृत्तज्ञ आहेस. तसेंच, तुझ्या ठिकाणी उत्तम चारित्र्य वसत आहे, त्यांत आश्चर्य नाही. टाकलेले पाणी खोलगट जागेतच रहात असतें. २८१ नैतच्छिथिलया बुद्धया त्वं वेत्सि महदन्तरम् ।
क च स्वजनसंवासः क च नीचपराश्रयः ॥ ६।८७।१४ (इंद्रजित् विभीषणाला म्हणतो.) स्वजनासह वास्तव्य करणे कोणीकडे, आणि शत्रूच्या आश्रयाला राहून नीच बनणे कोणीकडे ? यांतील महदंतर तुझ्या कोत्या बुद्धीमुळे तुला समजत नाही. २८२ नैवंविधमसत्कारं राघवो मषेयिष्यति ।
बलवानिव शार्दूलो वालधेरभिमर्शनम् ॥ २॥६१।१९ (कौसल्या दशरथाला सांगते, भरताने उपभोगिलेले राज्य राम स्वीकारणार नाही.) बलवान् व्याघ्र ज्याप्रमाणे पुच्छस्पर्श सहन करीत नाही, त्याप्रमाणे राम अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही. २८३ नैषा हि सा स्त्री भवति श्लाघनीयेन धीमता ।
उभयोर्लोकयोलॊके पत्या या संप्रसाद्यते ॥ २६२।१३ स्वर्गलोक व मनुष्यलोक या दोहोंमध्ये स्तुत्य असलेल्या विचारी भर्त्याकडून जी स्त्री आपण प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करून घेते,. ती स्त्री लोकामध्ये कुलीन म्हणून गणली जात नाही.
For Private And Personal Use Only