Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२४५ न सुप्रतिकरं तत्तु मात्रा पित्रा च यत्कृतम् ॥२॥११११९
आईबापांनी ( पुत्रावर ) केलेले उपकार फेडणे कधीही शक्य नाही. २४६ न हि कंचन पश्यामो राघवस्यागुणं वयम् ॥२॥३६।२७
(सिद्धार्थ प्रधान दशरथाला म्हणतो ) राघवाच्या ठिकाणी आम्हांला कोणताच दोष दिसून येत नाही. २४७ न हि गन्धमुपाघ्राय रामलक्ष्मणयोस्त्वया ।
शक्यं संदर्शने स्थातुं शुना शार्दूलयोरिव ॥५।२११३१ (सीता रावणाला म्हणते)कुत्रा वाघाच्या दृष्टीपुढे उभा राहणे जसे अशक्य आहे, त्याचप्रमाणे रामलक्ष्मणांची यत्किंचितही गंधवार्ता (सुगावा ) लागतांच त्यांच्या दृष्टीसमोर राहणे तुला अशक्य आहे. २४८ न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥२॥३७।२९ ( वसिष्ठमुनि कैकेयीला म्हणतात ) जेथें राम राजा नाही, तें ( स्थल) कधीही राष्ट्र होणार नाहीं; आणि जेथें राम वास्तव्य करील, तें वनही राष्ट्र होईल. २४९ न हि ते स्त्रीवधकृते घृणा कार्या नरोत्तम ॥२५।१७
(विश्वामित्र रामाला ताटकेचा वध करण्याविषयी सांगतात) हे पुरुषश्रेष्ठा, स्त्रीवध करावा लागत आहे म्हणून तूं मनामध्ये दया आणूं नकोस. २५० न हि धर्मविरुद्धेषु बह्वपायेषु कर्मसु ।
मूलघातिषु सज्जन्ते बुद्धिमन्तो भवद्विधाः ॥५।५१११८ (मारुति रावणाला म्हणतो ) जी कृत्ये धर्माच्या विरुद्ध आहेत, ज्यांत अनेक अपाय आहेत, जी समूळ घात करणारी आहेत, त्या कृत्यांच्या ठिकाणी तुमच्यासारखे बुद्धिमंत लोक आसक्त होत नाहींत.
For Private And Personal Use Only