Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
अचन एकून समजावी, उच्चा
१७६ दृष्टपूर्वं न ते रूपं पादौ दृष्टौ तवानधे ।
कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ॥ ७४८।२२ ('तूं माझ्याकडे समक्ष बघून जा ' असें सीतेने लक्ष्मणाला सांगितले असतां लक्ष्मण सीतेला म्हणतो) हे निष्पापे (सीते, ) तुझें रूप मी पूर्वी पाहिलेले नाही. तुझे चरण मात्र मी पाहिलेले आहेत. ह्या वनांत राम संनिध नसतांना मी तुझ्याकडे कसा बरें पाहूं ? १७७ दृष्टा देवीति हनुमद्वदनादमृतोपमम् ।
आकर्ण्य वचनं रामो हर्षमाप सलक्ष्मणः ॥ ५/६४।४३ हनुमंताच्या तोंडून आपण देवी (सीता) पाहिली, असें अमृततुल्य वचन ऐकून लक्ष्मणाला व रामाला परम हर्ष झाला. (आनंदाची वार्ता लौकर समजावी, अशी सर्वांना स्वाभाविक उत्सुकता असते, म्हणून मारुतीने वाक्य उच्चारतांना देखील त्यांतल्या त्यांत जो महत्त्वाचा शब्द 'दृष्टा' हाच आरंभी उच्चारला आहे.) १७८ देशकालविहीनानि कर्माणि विपरीतवत् ।
क्रियमाणानि दुष्यन्ति हवींष्यप्रयतेष्विव ॥ ६।६३६६ अयोग्य ठिकाणी व अयोग्यवेळी घडणारी विपरीतकर्मे असंस्कृत अग्नीमध्ये टाकलेल्या हविर्द्रव्याप्रमाणे दुःखाला कारणीभूत होतात. १७९ देशे देशे कलत्राणि देशे देशे च बान्धवाः ।
तंतु देशं न पश्यामि यत्र भ्राता सहोदरः॥६।१०१।१४ किंतु राज्येन दुर्धर्ष लक्ष्मणेन विना मम । कथं वक्ष्याम्यहं त्वम्यां सुमित्रां पुत्रवत्सलाम् ॥
६।१०१।१५ . (युद्धामध्ये रावणाने लक्ष्मणाला पाडिले असतां राम शोक करितो.) ठिकठिकाणी भार्या आहेत व ठिकठिकाणी बांधवही आहेत; परंतु लक्ष्मणासारखा भ्राता कोठे दृष्टीस पडेल असे मला 'वाटत नाही. हे आंजक्य, तुज लक्ष्मणावांचून मला राज्याशी काय कर्तव्य आहे ? पुत्रवत्सल सुमित्रा मातेला मी आतां काय बरें सांगू?
For Private And Personal Use Only