Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३९
१८५ धर्ममर्थं च कामं च काले यस्तु निषेवते ।
विभज्य सततं वीर स राजा हरिसत्तम ॥ ४।३८।२१ ( राम सुग्रीवाला म्हणतो ) हे वानरश्रेष्ठ वीरा, जो धर्म, अर्थ आणि काम यांचे कालविभागाने त्या त्या काळी सेवन करितो तोच ( खरा) राजा होय. १८६ धर्मलोपो महांस्तावत्कृते ह्यप्रतिकुर्वतः ।
अर्थलोपश्च मित्रस्य नाशे गुणवतो महान् ॥४॥३३॥४७ उपकाराबद्दल प्रत्युपकार न करणान्याच्या हातून मोठा धर्मलोप होतो. त्यामुळे गुणवान् मित्राच्या मैत्रीचा नाश होऊन मोठी अर्थहानिही होते. १८७ धर्मात्प्रच्युतशीलं हि पुरुषं पापनिश्चयम् ।
त्यक्त्वा सुखमवाप्नोति हस्तादाशीविषं यथा॥६८७।२२ हातांतून सर्पास टाकिलें असतां जसें सुख होते, त्याचप्रमाणे धर्मभ्रष्ट पापमति पुरुषाचा त्याग केला असतां सुख होते. १८८ धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् ।
धर्मेण लभते सर्व धर्मसारमिदं जगत् ॥ ३।९।३० धर्मापासून अर्थलाभ होतो, धर्मापासून सुख होते. धर्मापासून सर्व काही प्राप्त होते. हे जग म्हणजे धमांच्या आश्रयावर आहे. १८९ धर्मेण राष्ट्रं विन्दत धर्मेणैवानुपालयेत् ।
धर्माच्छरण्यतां याति राजा सर्वभयापहः।।७।५९५.२०१५ धर्माने राजाला राष्ट्र प्राप्त होत असून धर्माच्याच योगानें तो प्रजेचें परिपालन करण्यास समर्थ होतो. धर्माच्याच योगाने राजा सर्व भयांचे निवारण करणारा होत असल्यामुळे शरण जाण्यास तो योग्य होत असतो.
For Private And Personal Use Only