Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२०० न कालस्यास्ति बन्धुत्वं न हेतुर्न पराक्रमः।
न मित्रज्ञातिसम्बन्धः कारणं नात्मनो वशः॥४।२५।७ कालाला बंधुत्व नाही, त्याला कोणत्याही कारणाची गरज लागत नाहीं; त्याला फिरविण्यास पराक्रम समर्थ होत नाही, मित्र व ज्ञातिजन यांचा संबंधही त्याला लागत नाही, तो कोणाच्याही अधीन राहत नाही. २०१ न कालादुत्तरं किंचित्परं कर्म उपासितुम् ॥ ४।२५।३
वेळ निघून गेली म्हणजे कोणतेही सत्कर्म करितां येत नाही. २०२ न कुलेन न रूपेण
न दाक्षिण्येन मैथिली। मयाधिका वा तुल्या वा
तत्तु मोहान बुध्यसे ॥६।१११२८ ( मरण पावलेल्या रावणाकडे पाहून त्याची स्त्री मंदोदरी विलाप करते ) कुलाने, रूपाने अथवा सरळस्वभावाने सीता माझ्यापेक्षा जास्त नाही, इतकेच नव्हे, तर माझ्या बरोबरीचीही नाही; परंतु मोहामुळे तुला या गोष्टीचा उमज पडला नाही. २०३ न खल्वद्यैव सौमित्रे
जीवितं जाह्नवीजले। त्यजेयं राजवंशस्तु
भर्तुर्मे परिहास्यते ॥ ७४८८ (सीता म्हणते) हे लक्ष्मणा, गंगेच्या पाण्यांत मी आज प्राणत्याग करीत नाही. तसे केल्यास (मी गर्भवती असल्याकारणाने) पतीचा राजवंश नष्ट होईल.
For Private And Personal Use Only