Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१४ अधर्षितानां शूराणां समरेष्वनिवर्तिनाम् ।
धर्षणामर्षणं भीरु मरणादतिरिच्यते ॥ ४।१६।३ (वाली तारेला म्हणतो) हे भिव्ये, परोत्कर्ष सहन न करणारे व समरांत माघार न घेणारे, अशा शूरांना शāनी केलेला अपमान सहन करणे हे मरणाहूनहि अधिक दुःखदायक आहे. १५ अनभिज्ञाय शास्त्रार्थान्
पुरुषाः पशुबुद्धयः। प्रागल्भ्याद्वक्तुमिच्छन्ति
मन्त्रिष्वभ्यन्तरीकृताः॥६।६३।१४ मंत्रिजनांमध्ये समाविष्ट केलेले पशुबुद्धि पुरुष आपल्या आंगच्या बोलकेपणाच्या जोरावर अनभिज्ञास-अज्ञान्यास-शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात. १६ अनवस्थौ हि दृश्यते युद्धे जयपराजयौ ॥५॥३७५५ युद्धामध्ये जय काय किंवा पराजय काय, हे अनिश्चित असतात. १७ अनागतविधानं तु कर्तव्यं शुभमिच्छता ।
आपदाशङ्कमानेन पुरुषेण विपश्चिता ॥३॥२४।११ कल्याण इच्छिणाऱ्या विद्वान पुरुषाने पुढे विपत्ति येईल, अशी शंका येतांच, ती विपत्ति प्राप्त होण्यापूर्वीच परिहाराची योजना करावी. १८ अनिर्वेदं च दाक्ष्यं च मनसश्चापराजयम् ।
कार्यसिद्धिकराण्याहुस्तस्मादेतद्रवीम्यहम् ॥४।४९।६ (सीतेचा शोध लावण्याविषयी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असें अंगद वानरमंडळीला सांगतो ) उत्साह, दक्षता, आणि कार्याविषयी उन्मुखता, ही कार्यसिद्धि घडवून आणितात, असें म्हणतात, म्हणून हे मी सांगतो.
For Private And Personal Use Only