Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४३ अवश्यं प्राणिना प्राणा रक्षितव्या यथावलम् ॥ ६।९।१४ प्रत्येक प्राण्याने आपले प्राण अवश्य यथासामर्थ्य रक्षण करावे. ४४ अविज्ञाय फलं यो हि कर्म त्वेवानुधावति ।
स शोचेत्फलवेलायां यथा किंशुकसेवकः ॥२।६३।९ जो पुरुष कर्माच्या फलाचा विचार न करितां तें कर्म करण्यास प्रवृत्त होतो, त्याची फळ मिळण्याची वेळ प्राप्त झाली असतां, पळसाच्या झाडाची ( फलप्राप्त्यर्थ ) सेवा करणान्यासारखी शोकस्थिति होईल. ४५ अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्यथम् ।
उरःस्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ॥ ४॥३॥३१ अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्जनस्थया । कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ॥ ४३३३ ( मारुतीचे भाषण ऐकून राम लक्ष्मणाला म्हणतो) ( उत्तम वाक्य म्हटले म्हणजे) में अति विस्तृत नसते, संदिग्ध नसते, त्वरित उच्चारितां येते, श्रोत्यांच्या कर्णास पीडा देत नाही. उरःस्थलापासून कंठाकडे मध्यम स्वरांत-अति उच्च नाही, किंवा आति नीचही नाही-अशा स्वरांत जातें तें होय. (हृदय, कंठ आणि शिरःस्थान अशा ) तीन ठिकाणी स्पष्टपणे व्यक्त होणान्या (ह्याच्या) वाणीने खड्ग उगारून आलेल्या शत्रूचेही रंजन झाल्यावांचून रहाणार नाही. ( मग इतरांचे होईल, हे उघडच आहे.) ४६ अशोक शोकापनुद शोकोपहतचेतनम् ।
त्वन्नामानं कुरु क्षिप्रं प्रियासंदर्शनेन माम् ।३।६०११७ (राम म्हणतो.) हे शोकहारका अशोका ! माझी शोकानें ज्ञानशक्ति नष्ट झाली आहे. प्रिये (सीते) च्या दर्शनाने मला त्वरित तुझ्या नामाप्रमाणे (अशोक) कर.
For Private And Personal Use Only