Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
९३ कच्चिजानपदो विद्वान् दक्षिणः प्रतिभानवान् । - यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पण्डितः ॥२।१००।३५
(राम म्हणतो) हे भरता, स्वदेशांतील, विद्वान्, हुशार, बुद्धिमान, आज्ञेनुसार वागणारे आणि चतुर दूत तूं ठेविले आहेसना ? (श्लोक ९३ ते १०० यांमध्ये रामाने भरताला कुशल प्रश्न विचारिले आहेत.) ९४ कचित्सहस्रैर्मूर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् ।।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यानिःश्रेयसं महत् ॥२॥१००।२२ ., हजारों मूर्खाचा त्याग करून एकाच पांडताचा (सहवास) करण्याचें तूं इच्छितोस ना? कारण, कोणत्याही कार्यासंबंधाने संकट आले असतां पंडितच (तरणोपाय सुचवून ) कल्याण करितो. ९५ कचित्स्वादुकृतं भोज्यमेको नानासि राघव ।
कच्चिदाशंसमानेभ्यो मित्रेभ्यःसंप्रयच्छसि।।२।१०.७५ हे राघवा, (भरता) स्वादिष्ट केलेले भोज्य पदार्थ तूं एकटाच भक्षण करीत नाहींस ना ? त्या पदार्थांची इच्छा करणाऱ्या मित्रांना तूं ते देतोस ना ? ९६ कचिदर्थं च कामं च धर्म च जयतां वर ।
विभज्य काले कालज्ञ सर्वान्वरद सेवसे ॥२॥१००।६३ हे वीरश्रेष्ठा ! तूं कालज्ञआहेस, तसाच वरदही आहेस; तरी धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाचें तूं वेळा नेमून योग्यकाली सेवन करीत. असतोस ना ? ९७ कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम् ।
क्षिप्रमारभसे कर्म न दीर्घयसि राघव ।। २।१००।१९ (राम भरताला म्हणतो) हे राघवा, जें अल्प यत्नाने साध्य होणारे व ज्याचें फल मोठे आहे, अशा कार्याचा निश्चय करून ते कार्य त्वरित करितोस ना ? त्या कामी विलंब लावीत नाहीस ना?
For Private And Personal Use Only